पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ऑगस्ट 2018 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल हाती आला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्याने चांगली बाजी मारली असून बार्शी तालुक्यातील आशिष बारकूल हा राज्यात पहिला आला आहे.
महिलांमधून पुण्याच्या स्वाती दाभाडे या तर मागासवर्गीयातून सोलापूरचाच महेश जमदाडे प्रथम आला आहे.
एमपीएससीचा 136 पदांचा अंतिम निकाल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात करण्यात आला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आशिष बारकुल हा राज्यातून प्रथम आला आहे. नांदेडची सुप्रिया डांगे उपजिल्हाधिकरी संवर्ग परीक्षेत मुलींमधून राज्यात तीसरी आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यातील 37 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. राज्यसेवेची पूर्व परीक्षा 1 लाख 96 हजार 695 उमेदवारांनी दिली होती. त्यातून मुख्य परीक्षेसाठी 2 हजार 381 विद्यार्थी पात्र ठरले होते. मुलाखतीसाठी निवडण्यात आलेल्या 427 विद्यार्थ्यांमधून अंतिम 136 विद्यार्थ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
MPSC परीक्षेत सोलापूरचा डंका, आशिष बारकूल राज्यात पहिला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Feb 2019 10:21 PM (IST)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ऑगस्ट 2018 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल हाती आला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्याने चांगली बाजी मारली असून बार्शी तालुक्यातील आशिष बारकूल हा राज्यात पहिला आला आहे. महिलांमधून पुण्याच्या स्वाती दाभाडे या तर मागासवर्गीयातून सोलापूरचाच महेश जमदाडे प्रथम आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -