जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे नेमकी काय मागणी करतात, हे अजून मला कळालेले नाही. कारण प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते. तसेच अतिरिक्त कधीच होणार नाही अशाच गोष्टीची ते मागणी करतात. त्यांचे कोण सल्लागार आहेत हे कळत नाही. त्यांनी थोडा अभ्यास आणि थोडीशी माहिती घेऊन बोलत जा म्हणावं. मनोज जरांगेंना एक काडीचा देखील अभ्यास नाही. अशी बोचरी टीका लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake)मनोज जरांगे पाटील यांचावर केली आहे.
एसटीची लढाई आमची वेगळी आहे. एसटीची आमची लढाई चालू असताना आमच्या ताटातलं आरक्षण हिरावून घेतलं जात असेल तर आमचे छोटे-छोटे समाज पुढे येणार आहेत का? आमच्या धनगर समाजाचे सर्व नेते आणि आमच्यामध्ये सर्वांचे एकमत आहे. त्यामुळे बुद्धीभेद करू नका थोडीशी माहिती घेऊन बोलत जा, असा सल्लाही लक्ष्मण हाकेंनी जरांगे पाटील यांना दिला आहे.
निवेदनकर्त्या माणसाला काळ फासणे म्हणजे ही झुंडशही
डॉ. रमेश तारक सारख्या उच्चशिक्षित माणसाच्या तोंडाला काळ पासण अजिबात योग्य नाही. मात्र त्यांच्यात स्थानिक स्थरावर काय इशू आहेत, त्यांच्या कमिटीच्या लोकांबद्दलचे काय प्रकरण आहेत, तसेच त्याच्या पाठीमागे खूप काही गोष्टी घडत असणाऱ्या शासनाने यामध्ये लक्ष घालावे. गृह विभागानेही यामध्ये लक्ष घालावे. आज तोंडाला काळ फासले, उद्या काही अनुचित प्रकार घडू नये. आताची त्यांची वाटचाल त्यांच्यामध्ये घुसमट सुरू असल्याचे दाखवते. म्हणून तेव्हाच अशा घटना घडत आहेत. कायदा हातात घेऊन निवेदनकर्त्या माणसाला काळ फासले जात असेल तर ती झुंडशही आहे. कायद्याचा आवाज बांधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण हाकेंनी यावेळी बोलतांना दिली.
आंदोलनांना गालबोट लावायचे काम चांगलं नाही- लक्ष्मण हाके
डॉ. रमेश तारक यांना काळे फसले ते पाहून मला फार वाईट वाटले. आंदोलनांना गालबोट लावायचे काम चांगलं नाही, मी अशा काड्या करत नाही. डॉक्टरला माहिती आहे त्यांच्याकडून एखादी चूक झाली असेल तर ते आम्ही सोडून दिल आहे. समाजाला त्रास होईल असे पाऊल उचलायचे नाही. माझ्या आजूबाजूला माझ्या महाराष्ट्रातील जनता आहे. ते आंदोलक आजूबाजूला होते तर कुणाचं काय सांगता येतं. कुणावर विश्वास ठेवावा, असेही लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या