Bhandara Gondia Election 2024 :आपण लोकसभा का हरलो, नेते पक्ष सोडून का जातात, परत येत नाहीत. याचं आत्मपरीक्षण परीणय फुके (Parinay Fuke) यांनी करावं. मी सुद्धा भाजपमध्ये जाणार होतो, परंतु मला माहित होतं, उगीच परिणय फुके यांच्यामुळे वाद होतील. जुना इतिहास त्यांचा असा आहे की, त्यांच्या पक्षातून अनेक नेते सोडून गेलेत. माझ्या जाण्यानं आणखी वाद झाला असता. त्याच्यापेक्षा मी माझ्या स्व:घरी झाल्याचा निर्णय घेतला, अशी बोचरी टीका भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी भाजप नेते माजी राज्यमंत्री परिणय फुके यांच्यावर केलीय.
परिणाम फुकेंनी आत्मपरीक्षण करावं- नरेंद्र भोंडेकर
भाजप नेते परीणय फुके यांच्याकडून सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भंडाऱ्यात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगांने आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर कार्यक्रमाचं निमंत्रण आणि नियोजन नसल्याची टीका केली आहे. ती आता समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे, यावर आमदार नरेंद्र भोंडेकर बोलत होते. महायुतीच्या सगळ्याचं नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होत, विनंती केली होती आणि फोन सुद्धा करण्यात केले होते.
कार्यक्रमासाठी त्यांचे नाव सुद्धा आरक्षित करून पास सुद्धा पाठविण्यात आली होती. मी स्वतः परिणय फुकेंना कॉल लावला होता. त्यांच्या काही व्यस्त कामामुळं नाही आले असेल. भाजपचे आणि राष्ट्रवादीचे काही लोकं आले होते. 547 कोटी हा शासनाचा निधी प्राप्त झाला आणि या हा जिल्ह्याच्या विकासाच्या विकासाचा कार्यक्रम होता. त्यामुळं एखाद्यानं रुसवा फुगवा ठेवण्यापेक्षा त्याला विकासाच्या दृष्टीनं बघायला पाहिजे.असेही आमदार नरेंद्र भोंडेकर यावेळी म्हणाले.
आपण पाहिलेच लोकसभेत पराभूत झालेलो आहेत. त्यामुळं कमीत कमी आता येत्या विधानसभेत तिन्ही विधानसभेत तिन्ही पक्षाचे उमेदवार कसे निवडून येणार, याचं आपण नियोजन आखायला पाहिजे. हे सर्व नियोजन आखण्यापेक्षा एखाद्या विरोधकासारखं आपण टीका टिप्पणी करीत असाल तर हे चुकीचं आहे. अशी टीकाही नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.
भंडाऱ्यात महायुतीमध्ये बिघाडी झाली की काय?
भंडाऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५४७ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. भव्यदिव्य अशा या कार्यक्रमाचे जे बॅनर्स भंडारा शहरात लागलेत, त्यावर कुठेही महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो दिसले नाहीत. यासोबतच कार्यक्रमाचे आयोजक असलेले आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी फोन केला नाही. त्यामुळं कार्यक्रमाला गेलो नसल्याची संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे यांनी एबीपी माझा शी बोलताना व्यक्त केला. यावरून भंडाऱ्यात महायुतीमध्ये बिघाडी झाला की काय? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
स्थानिक नेत्यांनी मला फोन केला नाही- नाना पंचबुद्धे
मला पत्रिका पाठविली. मात्र, ज्यांचा कार्यक्रम होता, त्या आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी साधा फोन केला नाही. कालच्या कार्यक्रमाच्या वेळेवर दुपारी त्यांच्या एका नगरसेवकाचा मला फोन आला. मात्र, जो कार्यक्रम घेत आहेत, अशा आमदार भोंडेकर यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना फोन केला नाही. मी सुद्धा राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष आणि माजी मंत्री राहिलेला आहे, मला जर आमदार फोन करीत नसतील तर मी कशाला त्यांच्या कार्यक्रमाच्या स्टेजवर जावू.
परंतु महायुतीचा राष्ट्रवादी एक घटक पक्ष आहे. आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित दादा किंवा प्रफुल पटेल यांचा बॅनरवर कुठेचं फोटो नाही. आम्हाला त्यांचा फोन नाही किंवा निरोप मिळाला नाही. शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा असल्यानं आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही. असे मतही राष्ट्रवादी काँग्रेसचे भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे यांनी बोलताना व्यक्त केलंय.
इतर महत्वाच्या बातम्या