छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल (Maratha Reservation) बोलताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी एबीपी माझासोबत बोलताना दोन वक्तव्य केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत 9 मंत्र्यांचा पराभव करणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले होते. 127 मतदारसंघांची चाचपणी केल्याची माहिती देखील मनोज जरांगे यांनी दिली होती. विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघांसाठी पडताळणी मनोज जरांगे सहा टप्प्यात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील मतदारसंघांची यादी समोर आली आहे. 


मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने 288 जागांपैकी आतापर्यंत 127 मतदारसंघाची चाचपणी करण्यात आली आहे. यात गेल्या 10 वर्षांपासून मराठा आमदार विजयी झालेले मराठा मतांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघांना प्राधान्य देण्यात येत आहे. तर पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, जालना ,बीड, धाराशिव जिल्ह्यातील काही मतदार संघाची चाचपणी करण्यात आली आहे . 


 या मतदारसंघांत पडताळणी


छत्रपती संभाजीनगर : वैजापूर विधानसभा मतदारसंघ, गंगापूर विधानसभा मतदारसंघ, कन्नड विधानसभा मतदारसंघ, पैठण विधानसभा मतदारसंघ, फुलंब्री विधानसभा मतदारसंघ, सिल्लोड विधानसभा मतदारसंघ


जालना : बदनापूर विधानसभा मतदारसंघ,अंबड विधानसभा मतदारसंघ, घनसावंगी विधानसभा मतदारसंघ, परतूर विधानसभा मतदारसंघ, 


बीड : बीड विधानसभा मतदारसंघ, गेवराई विधानसभा मतदारसंघ, शिरूर विधानसभा मतदारसंघ, आष्टी विधानसभा मतदारसंघ, माजलगाव विधानसभा मतदारसंघ


धाराशिव :  धाराशिव विधानसभा मतदारसंघ, भूम विधानसभा मतदारसंघ, परंडा विधानसभा मतदारसंघ


राज्यातील आणखी काही मतदारसंघात चाचपणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. राज्य सरकारनं 13 जुलैपर्यंत सगे सोयरेचा अध्यादेश काढला नाही तर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा यापूर्वीच मनोज जरांगे यांनी केली आहे. 


मनोज जरांगे यांच्याकडून राज्य सरकारला 13 जुलै पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. राज्य सरकारच्यावतीनं सगेसोयरेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत उपोषण केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी उपोषण सोडवलं होतं.  


लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांचा प्रभाव जाणवला होता. मराठा समाज एकवटला आणि त्याचं रुपांतर मतामध्ये झालं तर त्याचा परिणाम होऊ शकतो, मात्र, निवडणुकीच्या वेळी काय स्थिती असेल यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील, 


दरम्यान, राज्य सरकारनं मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाची निर्मिती करुन 10 टक्के आरक्षण दिलेलं आहे. 


संबंधित बातम्या : 


बलिदान देण्याची वेळ आली तरी घाबरणार नाही, मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही : मनोज जरांगे


मी स्वत: निवडणूक लढवणार नाही, पक्ष काढण्यावर अद्याप निर्णय नाही - मनोज जरांगे पाटील