लातूर : उन्हाळी सुट्टीत बच्चे कंपनी झुकझुक करणाऱ्या आगगाडीतून मामाच्या गावाला जाण्याची स्वप्न बघत असतात. लातूरच्या रेल्वे स्टेशनवर पाण्याची गाडी पाणी कशी असते हे पाहण्यासाठी शाळांच्या सहली सुरु झाल्या आहेत.


 
ज्ञानप्रकाश विद्यालयाच्या मुलांनी मिरजेहून पाणी घेऊन आलेली वॉटर एक्स्प्रेस पाहिली. विद्यार्थ्यांना पाणी बचतीचं महत्त्व कळावं यासाठी या प्रयोगशील शाळेने पाणी एक्स्प्रेसला भेट दिली होती.

 
गेली 17 वर्षे वेगवेगळे प्रयोग ज्ञानप्रकाश शाळा करत आली आहे. 4 लिटर पाण्यात लहानग्यांनी आणि 7 लिटर पाण्यामध्ये मोठ्यांनी स्वच्छ आंघोळ कशी करावी याचा धडा मुलांना दिला आहे.

 

लातूरमधील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांगलीकरांनी पाणी एक्स्प्रेसच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला.