लातूर : बलात्कार पीडित मुलीला शाळेतून काढून टाकल्याचा निंदनीय प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला आहे. तसंच मुलीवर झालेल्या बलात्काराची तक्रार नोंदवण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी 50 हजार रुपये किंवा शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोपही पीडितेच्या आईनं केला आहे.
लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातील एका तांड्यावर पीडित मुलगी आपल्या आईसोबत राहते. चार महिन्यांपूर्वी लष्कराच्या जवानानं लग्नाचं आमिष दाखवून 15 वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
याबाबत देवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित मुलीची आई गेल्यावर पोलीस अधिकारी पाटील यांनी शारीरिक सुखाची मागणी केली. अन्यथा पन्नास हजार रुपये देण्यास सांगितल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर शाळा प्रशासनानं मुलीचं नाव कमी केल्याचा दावा पीडितेच्या आईने केला आहे. या प्रकरणी शाळा प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न 'एबीपी माझा' करत आहे.
लातुरात बलात्कार पीडितेला शाळेतून काढलं, आईचा आरोप
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर
Updated at:
27 Nov 2017 08:26 PM (IST)
चार महिन्यांपूर्वी लष्कराच्या जवानानं लग्नाचं आमिष दाखवून 15 वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -