एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 27/11/2017


1. गडचिरोलीच्या जंगलात प्राण तळहातावर घेऊन सात जवानांचा दीडशे नक्षलवाद्यांशी मुकाबला, एक जवान शहीद तर दोन जखमी, माझाचा स्पेशल रिपोर्ट https://goo.gl/uxFYBb

2. नवी मुंबईतल्या कामोठेमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून फेरीवाल्यांना मारहाण, विक्रोळीतल्या मारहाणीच्या घटनेनंतर मनसे आक्रमक http://abpmajha.abplive.in/live-tv

3. फेरीवाल्यांना हटवाल तर मार खावाच लागेल, संजय निरुपम यांची धमकी, विक्रोळीतील उपविभागप्रमुखाला झालेल्या मारहाणीनंतर मनसेची तातडीची बैठक https://goo.gl/bGJSGJ https://goo.gl/XmK1na तर अमित ठाकरे मध्यरात्री दोन वाजता मारहाण झालेल्या विश्वजित ढोलम यांच्या भेटीला https://goo.gl/YDr8ZZ

4. पिंपरी-चिंचवडमध्ये लिफ्ट सातव्या मजल्यावरुन थेट पहिल्या मजल्यावर कोसळली, खराब लिफ्टमुळे वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू https://goo.gl/5nkmRt

5. आमदारकीचं तिकीट मिळालं असतं तर शिवसेनेची मतं फुटली असती, विधानपरिषद पोटनिवडणुकीवर नारायण राणेंनी मौन सोडलं, भाजपचा निर्णय मान्य असल्याचीही कबुली https://goo.gl/Qp64pH

6. विधानपरिषदेसाठी नारायण राणेंना डच्चू, भाजपकडून प्रसाद लाड यांचा अर्ज, तर काँग्रेसकडून दिलीप माने मैदानात https://goo.gl/SYMxMW

7. खारघरमध्ये सात दिवसांपासून रिक्षाचालक संपावर, रिक्षाचालकांची आपापसात मारहाण, पोलिसांची रिक्षाचालकांवर कारवाई, प्रवाशांचे हाल http://abpmajha.abplive.in/live-tv

8. तुरुंगातील कैद्यांना नातेवाईकांशी व्हिडीओ कॉलिंगवरुन संपर्क साधता येणार, मुंबईतील मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणानंतर जेल प्रशासनाचा निर्णय, पोलीस महानिरीक्षक राजवर्धन सिन्हांची माहिती https://goo.gl/QuESMd

9. वर्ध्यात प्रेमविवाह केलेल्या नवदाम्पत्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, किरकोळ वादातून टोकाचं पाऊल https://goo.gl/VPPTHJ

10. महिनाभरात पैसे दिले नाहीत, तर पुन्हा टोल वसूल करु, आयआरबीचं कोल्हापूर महापालिकेला पत्र, राज्य सरकारनं पैसे भागवण्याचं आश्वासन पूर्ण न केल्याचा कंपनीचा दावा https://goo.gl/7X1EBe

11. गोकुळ दूधसंघाच्या मनमानी कारभारविरोधात कोल्हापुरात काँग्रेस आमदार सतेज पाटलांचा मोर्चा, गायी, म्हशींना सोबत घेऊन शेतकरी रस्त्यावर https://goo.gl/UenpV8

12. ‘गुजरातमध्ये सत्तारुढ पक्षाचीच लाट, देश विकासाच्या वाटेवर असून जीडीपीच्या आकडेवारीत सुधारणा’ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींचा दावा https://goo.gl/Tcg1rS

13. 'आप'ला आयकर विभागाकडून 30 कोटी 67 लाखांची नोटीस, पक्षाच्या देणगीमधील अनियमिततेमुळे आयकर विभागाची कारवाई https://goo.gl/SGYEHB

14. विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांमधून विश्रांती; भारताच्या वन डे संघाच्या नेतृत्वाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर https://goo.gl/4uW6ka

15. टीम इंडियाचा नागपूर कसोटीत श्रीलंकेवर एक डाव आणि २३९ धावांनी दणदणीत विजय; रवीचंद्रन अश्विनच्या कसोटी विकेट्सचं विक्रमी त्रिशतक साजरं https://goo.gl/PzvPZR https://goo.gl/UYniwg

संपूर्ण घटनाक्रम : ... आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली! https://goo.gl/3KZzUb

माझा विशेष : संजय निरुपम यांना अटक का नाही? विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता फक्त एबीपी माझावर.

BLOG :  ब्लॉगर समीर गायकवाड यांचा विशेष ब्लॉग, रेड लाईट डायरीज : आज्जी आणि चाईल्ड सेक्स वर्कर्स.... https://goo.gl/FFCZcz

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर