उदगीर (लातूर) : वडिलांचं निधन झाल्याचं अपघातग्रस्त मुलाला कळू नये म्हणून आटापिटा करणाऱ्या एका माऊलीला पाहून कोणाचंही मन हेलावेल. लातूर जिल्ह्यातील उदगीरमधल्या या आईने एका डोळ्यातले अश्रू लेकासाठी लपवले आहेत.

48 वर्षांच्या शेजमजूर उषाबाई लखनगावे... विधवा होऊनही कपाळावर भलं मोठ्ठ कुंकू लावतात. हातात बांगड्या भरतात. मुलासमोर दुःखाचा उमाळा येऊ नये, म्हणून भरलेले डोळे एकांतात पुसतात. डोळे पुसून पुन्हा मुलाच्या सेवा-सुश्रुषेसाठी येतात.

20 मार्चला अमोलच्या कंबरेवरुन ट्रँक्टरचं चाक गेलं. कंबरेपासूनचा भाग लुळा पडला. अमोलच्या अपघातावेळी उषाबाई काशीला गेलेल्या, परतल्यावर पोराच्या अपघाताची बातमी कळली. उषाबाई दवाखान्यात आल्या. मात्र मुलाच्या उपचाराच्या चिंतेनं अमोलच्या वडिलांनी 27 मार्चला आत्महत्या केली.

पतीच्या निधनानं उषाबाई खचल्या. पण एकमेव मुलाला पुन्हा पायावर उभ्या करण्यासाठी कामाला लागल्या. कपाळावरचं कुंकू आणि हातातल्या बांगड्या कायम राहिल्या.

अमोलवर उपचार करणाऱ्या लाईफ केअरनही उपचाराचा खर्च निम्म्यावर आणला आहे. अमोल पुन्हा सामान्य होऊ शकणार नाही, मात्र 80 टक्के बरा होईल, असं डॉक्टर सांगतात.

या शेतमजूर कुटुंबात 3 कर्त्या हातांपैकी दोघांचे हात कमवायचं थांबले आहेत. अमोलच्या उपचाराचा खर्च मोठा आहे. अशा या जिद्दी आईला सलाम करत महाराष्ट्रानं मन मोठं करायला हवं. त्यांना भरभरुन मदत करायला हवी.

उषाबाईंना मदत करण्यासाठी बँक खात्याचा तपशील

रुद्रानी हेल्थकेअर सर्व्हिसेस लिमिटेड 
बँक ऑफ इंडिया
पुणे कॉर्पोरेशन बँकिंग शाखा
पुणे
अकाऊण्ट नंबर : 052130110000055
ifsc code : BKID0000521

उषाबाई नागनाथ लखनगावे
स्टेट बँक ऑफ इंडिया
देवनी शाखा, जिल्हा लातूर
ब्रांच कोड : 3812
अकाऊण्ट नंबर : 32202314524
Ifsc code : SBIN0003812