रायगड : डंपरने पाण्याच्या पाईपलाईनला जोरदार धडक दिल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. रायगडच्या उरण तालुक्यातील कंठवली गावाजवळ ही घटना घडली आहे.


पाईपलाईन फुटल्याने 30 ते 40 फुटांचा उंच कारंजा उडत आहे. त्यामुळे या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासडी होत आहे.

पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम सुरु असून ते पूर्ण होण्यासाठी किमान 10 ते 12 तास लागण्याची शक्यता आहे. परिणामी खारघरसह आसपासच्या परिसरातील पाणीपुरवठा थांबवण्यात आला आहे.

20 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असं सांगण्यात आलं आहे.