लातूर : लातूर जिल्ह्यात 7 मार्चला एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा आहे. मात्र, दोन दिवस आधीच पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत हादरा दिला आहे.


एमआयएमला राम राम करताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ओवेसी बंधूंचे पुतळे पायदळी तुडवत जाळले. त्यामुळे 7 मार्चच्या सभेत काय होणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

लातूर महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्याचवेळी अचानक पक्षाने लातूरच्या जिल्ह्याध्यक्षाची उचलबांगडी करत नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या मोहमदअली शेख यांच्या समर्थकांनी एमआयएम सोडण्याचा निर्णय घेतला.



मोहमदअली शेख हे एमआयएमच्या राज्य कोअर कमिटीचे सदस्य आहेत. त्यांनी निलंगा, देवणी, औसा, नळेगाव यांसह जिल्ह्यातील दीड हजार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत, ओवेसी बंधूंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आमदार इम्तियाज जलील यांच्यावर सर्वाचा रोष आहे. जलील यांच्या नावे घोषणाबाजी करत त्यांचे पुतळे पायदळी तुडविण्यात आले. त्यानंतर हे पुतळे जाळन्यातही आले. येथून पुढे कोणत्याही पक्षात न जाता एक समर्थ पर्याय तयार करू असेही, यावेळी सांगण्यात आले.