सांगली : सांगलीत गर्भपातादरम्यान स्वाती जमदाडे नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली . मात्र या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळा गावातील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेच्या भारती हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात करण्यात येत होते, हे आता उघड झालं आहे. हॉस्पिटलगतच्या परिसरात पोलिसांनी तपास केला असता त्यांना अर्भकं लपवण्यात आलेल्या 19 पिशव्या सापडल्या आहेत.
स्वाती जमदाडेचा मृत्यू देखील म्हैसाळ्यातील याच भारती हॉस्पिटलमध्ये झाला होता. दरम्यान पोलिसांनी डॉक्टर बाबासाहेब भद्रापुरेच्या साथीदाराला ताब्यात घेतलं आहे. तर स्वाती जमदाडेच्या मृत्यूनंतर भद्रापुरे फरार झाला आहे.