लातूर : संपूर्ण राज्यात मागील काही दिवस कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. आरोग्य यंत्रणांचे अथक परिश्रम सुरु असताना आणि प्रशासन कठोर पावलं उचलतानाही परिस्थिती मात्र काही केल्या नियंत्रणात येण्याचं नाव घेत नाही आहे. परिणामी मृतांच्या संख्येतही मोठी भर पडत आहे.


लातूर जिल्ह्यातही कोरोना संसर्गाने अक्षरशः कहर केला आहे. एक प्रकारे इथं कोरोनानं थैमानच घातलं आहे. शनिवारी लातूरच्या खाडगाव स्मशानभूमीत 22 तर, रविवारी 27 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला तर, त्यावर मनपा प्रशासनाकडून अंत्यसंस्कार करण्यात येतात. नातेवाईक यांची संख्या कमी असावी हा दंडक आहे इथं आहे. 


अनेक वेळा तर, संपूर्ण कुटूंबच कोरोनाग्रस्त असल्यामुळे अंत्यसंस्कार करताना नातेवाईकच हजर नसतात. बऱ्याच वेळा दशहतीमुळेही जवळचे नातलग हे अग्नीही देण्यास तयार होत नाहीत अशी परिस्थिती असल्याची माहिती मनपा कर्मचारी देत आहेत. 


लातूर जिल्ह्यात दिवसभरात १६४३ कोरोना रुग्ण आढळल्याची आरोग्य विभागाची माहिती आहे. अहवाल तयार करेपर्यंत आजचे मृत्यू २५ असल्याची प्रशासनाची माहिती आहे. आजमितीस जिल्ह्यात 15 हजार पेक्षा जास्त ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 


Coronavirus Nashik | आर्थिक व्यवहार थांबले, तरी नागरिकांचा जीव वाचेल; नाशिकमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्याची महापौरांची मागणी


सगळीकडे परिस्थिती जवळपास सारखी 


फक्त लातूरत नव्हे, तर परिस्थिती जगळीकडे जवळपास एकसारखीच आहे. रुग्णसंख्या अतिशय झपाट्यानं वाढत असल्यामुळं आता आवश्यक असणाऱ्या सुविधा मोठ्या फरकारनं कमी पडताना दिसत आहेत. ज्यामुळं प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. असं असलं तरीही कोणतंही कारण नसताना घराबाहेर पडणारे कलंदरही काही कमी नाहीत. पण, हे दाहक वास्तव पाहता घराबाहेर पडण्याआधी तुम्हीही एकदा हा विचार कराच.