Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 एप्रिल 2021 रविवार  | ABP Majha


1. काल दिवसभरात 67 हजार 123 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 499 जणांचा मृत्यू, पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा अनेक आमदारांचा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह


2. कोरोना विषाणूच्या डबल म्युटेशनमुळं दुसरी लाट, राजेश टोपेंची माहिती, 61 टक्के नमुन्यांमध्ये विषाणूचा नवीन स्ट्रेन 


3. रेमडेसिवीरचे पुरवठादार डोकानियांना ताब्यात घेतल्यानंतर फडणवीस, दरेकरांची पोलीस ठाण्यात धाव, रेमडेसिवीरवरुन राजकारण शिगेला


4. वर्ध्यात जेनेटेक लाईफ सायन्स कंपनीकडून होणार रेमडेसिवीरची निर्मिती, गडकरींच्या पाठपुरवठ्याला यश, तर केंद्राकडून रेमडेसिवीरच्या किंमतीतही कपात


5. महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 एप्रिल 2021 | रविवार | ABP Majha



6. महानगरपालिकेच्या 6 रुग्णालयांमधील 168 कोरोना बाधित रुग्णांचे स्थलांतर, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे प्रशासनाचा निर्णय


7. औषधांची दुकानं वगळता पुण्यात आज अत्यावश्यक सेवेची दुकानंही बंद राहणार, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिकेचा मोठा निर्णय 


8. पुण्यात कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक


9. आजपासून मुंबईत खासगी वाहनांसाठी कलरकोड लागू, मुंबई पोलीस आयुक्त नगरांळेची माहिती, कलरकोडचा गैरवापर केल्यास गुन्हा दाखल होणार


10. मुंबईचा हैदराबादवर 13 धावांनी विजय, शेवटच्या 5 षटकांत ट्रेन्ट बोल्टच्या धडाकेबाद गोलंदाजीमुळं डाव पलटला, पोलार्ड ठरला सामनावीर