मुंबई: दहा महापालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर आता लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगानं या पालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला. त्यानुसार 19 एप्रिलला मतदान होणार आहे तर 21 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. लातूर महापालिकेत सध्या काँग्रेसची सत्ता आहे तर परभणीत राष्ट्रावादी तर चंद्रपुरात भाजपची सत्ता आहे.


या महापालिकांसाठी 27 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तर 7 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

लातूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 70

राष्ट्रवादी काँग्रेस- 13

काँग्रेस- 49

शिवसेना- 06

रिपाइं- 02

लातूर महानगरपालिकेत सध्या काँग्रेसच्या महापौर विराजमान आहे. मागील वेळेस भाजपाला लातूरमध्ये खातेही उघडता आले नव्हते. आता खरी लढत भाजपा आणि समोर उर्वरित सर्व पक्ष अशी होणार आहे.

परभणी महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 65

राष्ट्रवादी काँग्रेस- 30

काँग्रेस- 23

शिवसेना- 8

भाजप- 2

अपक्ष- 2

परभणी महानगरपालिकेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौर विराजमान आहे.

चंद्रपूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 66

काँग्रेस- 26

भाजप- 18

शिवसेना- 5

राष्ट्रवादी- 4

मनसे- 1

बीएसपी-1

अपक्ष- 10

भारिप बहुजन महासंघ- 1

सध्या चंद्रपूर पालिकेत भाजपचा महापौर आहे. पालिकेतील सत्ता सर्वपक्षीय आहे. काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर दोन गट आहेत. माजी खासदार नरेश उगलीया यांचा गट तर रामू तिवारी यांचा दुसरा गट आहे. रामू तिवारी यांच्या गटातील 12 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं महापौर भाजपचा आहे.