औरंगाबाद : विनाअनुदानित शाळांना अनुदान द्या, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलक शिक्षकांना पोलिसांवर दगडफेक केली. या गोंधळात नऊ पोलिसांसह काही आंदोलक शिक्षक जखमी झाले आहेत.
UPDATE : औरंगाबाद सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये आंदोलक शिक्षकांविरोधात दंगल भडकवण्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु


मराठवाड्याच्या विविध प्रश्नासंदर्भात आज राज्यमंत्रिमंडळाची आज औरंगाबादमध्ये बैठक होती. त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी अनुदान देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता.

मात्र पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. यावेळी पोलिसांनी काही शिक्षकांना ताब्यात घेतलं.