धुळ्यात अतिवृष्टी, साक्री तालुक्यात दोन पाझर तलाव फुटले
एबीपी माझा वेब टीम | 04 Oct 2016 01:34 PM (IST)
धुळे : जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. या पावसाचा साक्री तालुक्याला सर्वाधिक फटका बसलाय. मुसळधार पावसाने साक्री तालुक्यातील 500 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय. कापूस, बाजरी,भुईमूग,मका,कांदा,यांसह फळबागांचं देखील नुकसान झालं आहे. पावसाचा जनावरांनाही फटका बसला. 163 जणावरं दगावल्याची नोंद झाली आहे . तर 72 घरांची पडझड झाली आहे. पाऊस अजूनही सुरूच आहे. पूरस्थिती असल्यामुळे पांझरा, तापी नदी काठच्या गावांना सर्कतेचा इशारा देण्यात आलाय.