औरंगाबादमधील शिक्षक मोर्चा, 250 शिक्षकांवर गुन्हे दाखल, 57 जण ताब्यात
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 05 Oct 2016 12:08 PM (IST)
औरंगाबाद: औरंगाबादमध्ये काल विनाअनुदानित शाळांनाही अनुदान मिळावे या मागणीसाठी शिक्षणकांनी मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये परिसरातील अनेक शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चावेळी पोलिसांनी लाठीहल्ला केल्याने आंदोलक संतप्त शिक्षकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. गोंधळात पोलिसाचा मृत्यू या प्रकरणी 250 शिक्षक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी 57 शिक्षकांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, त्यांच्याविरोधात दंगल भडकवण्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा कलम करण्यात आला आहेत. शिक्षकांच्या या मोर्चावेळी झालेल्या दगडफेकीत नऊ शिक्षकांसह काही आंदोलक शिक्षकही जखमी झाले होते.