मनमाड : महाराष्ट्रातील सर्वच लहान-थोर स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साड्यांची राणी पैठणी. पदरावचे सोनेरी मोर, आकर्षक रंगसंगती आणि ते वैशिष्टय़पूर्ण काठ ही पैठणीची ओळख. मात्र पैठणीचं माहेरघर असलेल्या येवल्यात दोन्ही बाजूने नेसता येईल अशी आगळी वेगळी पैठणी तयार करण्यात आली आहे.


राजराजेश्वरी वस्त्र अशी ओळख असलेल्या पैठणी या महावस्त्राला समस्त महिला वर्गात मोठं स्थान आहे. येवल्यात तयार होणाऱ्या हातमागावरील पैठणीला देशातच नव्हे तर विदेशात मागणी आहे. आज पर्यंत केवळ एकाच बाजूने नक्षी काम असेली पैठणी आपण पाहिली. मात्र येवल्यातील भांडगे पैठणीचे मालक आणि पाच वेळा राष्ट्रपती विजेत्या ठरलेल्या शांताराम भांडगे यांच्या पैठणीच्या दुकानात एक वेगळीच पैठणी विक्रीला आली आहे.

घे भरारी | स्टाईलबाजी | जुन्या पैठणीपासून ट्रेण्डी कुर्ता कसा शिवायचा?



शांताराम भांडगे यांनी अनेक पैठण्या या पूर्वी बनविल्या असल्या तरी खुप वर्षापुर्वी ते ज्या रिसर्च विभागात काम करत होते. त्यावेळी त्यांना दोन्ही बाजूला वेगवेगळे रंग असलेल्या साडीचे फोटो पाहण्यात आले. त्यावेळी त्यांनी तशी साडी मागावर बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फारसा यशस्वी झाला नाही. अखेर त्यावर प्रयत्न करत त्यांनी आपल्या घरातच हा प्रयोग सुरु ठेवला आणि अखेर दोन रंगाची पैठणी, त्यावर नक्षीकाम असलेली पैठणी आठ महिन्याच्या प्रयत्ना नंतर यशस्वीरित्या पूर्ण केली. या पैठणीसाठी त्यांना नेहमीच्या पैठणीला लागणा-या रेशामाच्या दुप्पट रेशीम वापरावे लागले. जो पर्यंत मनाचे समाधान होत नाही तो पर्यंत त्यांनी पैठणीचे काम विणकाम सोडले नाही. अखेर त्यांच्या मेहनतीला फळ आले आणि त्यांच्या मनासारखी दोन्ही बाजूने वापरता येईल अशी पैठणी तयार झाली.

Gas Cylinder Rate | विनाअनुदानित गॅस सिलेंडर 19 रुपयांनी महागलं | ABP Majha



आज पर्यंत महिलांसाठी आवडती असलेल्या पैठणीमध्ये काही तरी नविन करण्याचे प्रयत्न येवल्यातील पैठणी विणकरांनी यापूर्वी केले असले तरी एकाच वेळी दोन्ही बाजूने हवी तेव्हा पैठणी वापरता येईल अशी पैठणी तयार झाली नसल्याने ही पैठणी अनमोल असून याची किमंत मात्र आज करता येणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या : 

Shivsena | मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत असंतोष, डझनभर आमदार नाराज असल्याची चर्चा