- राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तब्बल 1600 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
- 395 किलो सोनं ज्याची किंमत 118 कोटी 50 लाख रुपये आहे.
- संस्थानकडे 4 हजार किलो चांदी आहे, जी 19 कोटींच्या घरात आहे.
- 11 कोटी रुपयांचे हिरे, माणिक आणि मोतीही आहेत.
- विविध कंपन्यांचे बॉन्ड आणि परकीय चलनाची मोजदादच नाही.
साई संस्थानावर भाजपचा झेंडा, काँग्रेस हद्दपार
एबीपी माझा वेब टीम | 29 Jul 2016 10:55 AM (IST)
शिर्डीः साई संस्थानवरील काँग्रेसची सत्ता आता संपुष्टात आली आहे. दोन ते तीन हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या साई संस्थानातून विखे गटाला हद्दपार करण्यात आलं आहे. यापुढे इथे भाजपची सत्ता असणार आहे. राज्य सरकारच्या विधी आणि न्याय खात्याने नवे विश्वस्त म्हणून नवी मुंबईचे भाजप नेते सुरेश हावरेंची संस्थानच्या विश्वस्तपदी वर्णी लावली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का साई संस्थानचा कारभार गेली अनेक वर्ष स्थानिक आमदारच बघायचे. त्याप्रमाणं 2004 पासून 2012 पर्यंत म्हणजे विश्वस्त मंडळ बरखास्त होईपर्यंत जयंत ससाणे संस्थानचा गाडा चालवत होते. अर्थात त्यांच्या जोडीला काँग्रेस पक्षाशी संबंधित 7 सदस्य आणि राष्ट्रवादीचे 6 सदस्य होते. पण सत्ता गेल्यानंतर आता काँग्रेस राष्ट्रवादीला येथूनही हद्दपार करण्यात आलं आहे. जशा बँका, कारखाने, दूध डेऱ्या राजकारणाचं, अर्थकारणाचं केंद्रबिंदू आहेत, तशीच स्थिती राज्यातल्या मोठ्या देवस्थानांची आहे. कारण इथं भक्त डोळे दिपवणाऱ्या देणग्या देतात. त्यातून संस्थान तर श्रीमंत होतातच पण विश्वस्त, सदस्यांचीही राजकीय बेजमी होते. अशी आहे साई संस्थानची संपत्ती