'कुरकुरे'च्या पुड्यातील शिट्टीसाठी 12 वर्षीय मुलानं जीव गमावला
एबीपी माझा वेब टीम | 29 Jul 2016 09:24 AM (IST)
बीड: 'कुरकुरे'च्या पुड्यामध्ये असलेल्या शिट्टीसाठी भावांचं झालेलं भांडण एकाच्या जीवावर बेतलं. बीड जिल्ह्यातल्या डूकडेगावात ही घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी गणेश आणि राजेश पवार या दोघाभावांची कुरकुरेच्या पुड्यात असलेल्या शिट्टीवरून भांडण झालं आणि त्यानंतर रागाच्या भरात १२ वर्षाच्या गणेशने विष प्राशन केलं. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र, काल उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. VIDEO: