सातारा : साताऱ्या रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सज्जनगडावरील दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यामुळे सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या आठ गावांचा संपर्क तुटला आहे, तर सज्जनगडावर गेलेले भाविकही अडकून पडले आहेत.


 
दरड कोसळल्याने सुदैवाने कोणताही अनर्थ घडलेला नाही, मात्र वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली आहे. सध्या सज्जनगडावरील दरड हटवण्याचं काम सुरु आहे.

 
सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री दहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. सातारा लगतच्या परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. साताऱ्यातील मान खटाव या दुष्काळी भागातसुद्धा पावसाने हजेरी लावली.

 
सुसाट वाऱ्यासह पडत असलेल्या पावसामुळे सातारा परिसरातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. या पावसामुळे अनेक झाडे पडली. मात्र वाऱ्यासह पडत असलेल्या पावसाने साताऱ्याच्या वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे.