सासूबाईंच्या मृत्यूचा धक्का असह्य, सूनेची इमारतीतून उडी मारुन आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 09 Mar 2019 01:30 PM (IST)
सासूबाईंच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सूनबाई शुभांगी संदीप लोखंडे यांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.
(प्रातिनिधिक फोटो)
कोल्हापूर : सासूबाईंच्या मृत्यूने व्यथित झालेल्या सुनेनेही आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या आपटेनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सासूबाई मालती मधुकर लोखंडे या कर्करोगामुळे गेले काही दिवस त्रस्त होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार झाले होते, मात्र आज सकाळी राहत्या घरीच उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. सासूबाईंच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सूनबाई शुभांगी संदीप लोखंडे यांनी टोकाचं पाऊल उचललं. शुभांगी यांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. उडी मारण्यापूर्वी शुभांगी यांनी घरातला अंगारा फुंकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची सर्व चौकशी करण्यासाठी जुना राजवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले आहेत.