जळगाव : आरोग्य मंत्री दीपक सावंत याचे स्वीय सहाय्य्क सुनील माळी यांनी धमकावल्यामुळे डॉ. मनिषा महाजन यांनी फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. देवरे येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.


 

 

सुनील माळी आणि काही अज्ञात लोक सातत्याने धमकावत आहेत, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. आपल्यावर अन्याय झाला आहे, असं स्टेटस ठेवून डॉ. महाजन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

 

 

डॉ. महाजन यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि दीपक सावंत यांना पत्र लिहू सुनील माळी विरोधात तक्रार केली होती. सुनील माळी आपल्याशी अश्लील भाषेत संभाषण करत असल्याचं डॉ. महाजन यांनी पत्रात म्हटलं होतं.

 

 

मात्र तक्रारीनंतर सुनील माळी आणि काही अज्ञात लोकांकडून मानसिक त्रास सुरु झाला, असं डॉ. महाजन यांनी सांगितलं आहे.