Kudal Nagarpanchayat Election :  कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी सात नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेनं दोन नगरसेवक निवडून आलेल्या कॉंग्रेसला नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिला आहे. आमदार वैभव नाईक यांनी याबाबत घोषणा केली आहे. तर दोंडामार्गमध्ये 13 नगरसेवकांचं स्पष्ट बहुमत असताना भाजप विरुद्ध भाजप अशी निवडणूक होणार आहे. 


जिल्ह्यातील चार नगरपंचायत पैकी 2 भाजप तर दोन महाविकास आघाडीकडे आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ताब्यात असलेल्या नगर पंचायती राखण्यात नारायण राणे यशस्वी होणार? की देवगड मागोमाग प्रतिष्ठेचे कुडाळ पुन्हा एकदा हातून जाणार? याकडं लक्ष लागलं आहे. 


तळकोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र येत प्रतिष्ठेची असलेली कुडाळ नगरपंचायत आपल्या ताब्यात घेण्यासाठी तयार असून राणेंना धक्का देण्याच्या तयारीत आहे. दोन नगरसेवक असलेल्या काँग्रेसला शिवसेनेने नगराध्यक्षपद देत कुडाळ नगरपंचायत महाविकास आघाडीकडे आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिवसेना काँगेस अंतर्गत मतप्रवाह राणेंच्या पथ्यावर पडणार का पहावं लागेल. कारण भाजप कुडाळ नगरपंचायत आपल्या ताब्यात येणार असा दावा करत आहे. तर दोडामार्गात भाजपमध्ये दोन गट पडल्यानं भाजप विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील चार नगरपंचायत पैकी 2 भाजप तर दोन महाविकास आघाडीकडे आहेत. 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिष्ठेची नगराध्यक्ष निवडणूक आहे. कुडाळमध्ये भाजप 8, शिवसेने 7 आणि काँग्रेसचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत. भाजप सत्तेच्या जवळ असताना आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना आणि काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. असं असताना काँग्रेसनं नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर दोडामार्गमध्ये 13 नगरसेवकांचा स्पष्ट बहुमत असताना इथे भाजप विरूद्ध भाजप अशी निवडणुक होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ताब्यात असलेल्या नगर पंचायती राखण्यात नारायण राणे यशस्वी होणार? की देवगड मागोमाग प्रतिष्ठेचे कुडाळ पुन्हा एकदा हातून जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nagar Panchayat Election: नगरपंचायतीचा निकाल काय सांगतो? ओबीसींना राजकीय आरक्षण हवं की नको?



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा