मुंबई : बलात्कारासारख्या गुन्ह्यात अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणेच कारवाई करण्याची तरतूद करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

 

कोपर्डी बलात्कार प्रकरणावर आज विधानसभेत चर्चेला सुरुवात झाली. कोपर्डी प्रकरण ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. परंतु सरकारला या प्रकरणाचं गांभीर्य नाही. सरकार या प्रकरणाच्या चर्चेपासून पळ काढतंय, असा आरोप राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.

 

सरकारने पाशवी बलात्कारासारख्या गुन्ह्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद करावी. शिवाय आरोपींना भरचौकात फाशी द्यावी, अशी मागणीही विखे-पाटलांनी यावेळी लावून धरली.

 

चर्चेदरम्यान राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. राम शिंदेंना नगरमध्ये जाऊन हॉटेलच्या उद्घाटनासाठी वेळ होता. पण पीडित मुलीला भेटण्यासाठी नाही, असा आरोप त्यांनी केला.

 

इकतंच नाही तर स्वत: मुख्यमंत्र्यांनी कोपर्डीला जाऊन पीडित मुलीची, तिच्या कुटुंबीयांची विचारणा केली नाही. त्यामुळे गृहमंत्रीपद स्वत:कडे ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा हट्ट का?, असा सवालही विखे-पाटील यांनी उपस्थित केला.

 

कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार

13 जुलैला कोपर्डीतील नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी आजोबांच्या घरुन आपल्या स्वत:च्या घरी जात होती. त्यावेळी तिघांनी शेतात ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. तिची हत्या करण्याआधी तिच्या देहाची क्रूर विटंबनाही केली होती. याप्रकरणी जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या नराधमांना अटक करण्यात आली आहे. दोघांना 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 



कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार

13 जुलैला कोपर्डीतील नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी आजोबांच्या घरुन आपल्या स्वत:च्या घरी जात होती. त्यावेळी तिघांनी शेतात ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. तिची हत्या करण्याआधी तिच्या देहाची क्रूर विटंबनाही केली होती. याप्रकरणी जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या नराधमांना अटक करण्यात आली आहे. दोघांना 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

...तर हत्यारं उचलायला घाबरु नका, कोपर्डी प्रकरणावर नानांचा संताप


कोपर्डी बलात्कार : महाराष्ट्रासाठी काळा दिवस : सुप्रिया सुळे


कोपर्डी बलात्कार: विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव?


कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार


नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर


कोपर्डी प्रकरण: राम शिंदेंसोबत फोटोत असलेली ‘ती’ व्यक्ती आरोपी नाही


आरोप करणाऱ्यांनी राम शिंदेंची जाहीर माफी मागावी: मुख्यमंत्री


राम शिंदे फोटो प्रकरणावर धनंजय मुंडेंकडून दिलगिरी


मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाई


कोपर्डी बलात्कारातील आरोपीचा राम शिंदेंसोबत फोटो, राष्ट्रवादीचा दावा