अहमदनगर: राज्यासह देशाला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी कँडल मार्च काढण्यात येणार आहेत. तसंच आरोपींच्या शिक्षेसाठी मोर्चेही काढले जाणार आहेत.
13 जुलै 2016 रोजी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर नराधमांनी बलात्कार करुन तिची हत्या केली होती.
अहमदनगरमधील कोपर्डीतल्या बलात्कार पीडितेचं स्मारक
त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटले होते. लोकांच्या संतापानंतर या घटनेतील आरोपींना अटक झाली. त्यानंतर सरकारनं वर्षभरात हा खटला निकाली काढण्याच आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा झाली नाही.
कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार
अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.
नराधमांना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय शांत बसणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्काराबाबत विधानसभेत माहिती देताना म्हणाले, “आरोपींना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. तसेच, या कारवाईसाठी विरोधकांनी सरकारला पाठिंबा देऊन, आपण एक आहोत, हा संदेश द्यावा.”
राज्यभरात मराठा मूक मोर्चे
कोपर्डी घटनेच्या संतापाची लाट राज्यभर पसरली. या घटनेचा निषेध म्हणून राज्यभरात मराठा क्रांती मूकमोर्चे निघाले. औरंगाबादेत 9 ऑगस्ट 2016 रोजी पहिला मराठा मूक मोर्चा निघाला. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने मोर्चे काढण्यात आले.
संबंधित बातम्या
कोपर्डी बलात्कार: साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचं नाव!
कोपर्डी बलात्कार : तपासात जात आडवी येणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, राणे आणि धनंजय मुंडे चेकमेट !
कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार
नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर
मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाई
अहमदनगरमधील कोपर्डीतल्या बलात्कार पीडितेचं स्मारक