कोपर्डी बलात्कार : राज्यभरात निषेध, अनेक ठिकाणी शाळा बंद
एबीपी माझा वेब टीम | 18 Jul 2016 07:58 AM (IST)
मुंबई: अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार हत्येप्रकरणी राज्यभरात निषेध नोंदवले जात आहेत. या घटनेच्या निषेधार्थ व्यावसायिक बंद बरोबरच काही खेड्यांमध्ये शैक्षणिक बंद पुकारुन शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात 100 टक्के बंद पाळण्यात आला असून शाळा, कॉलेज आणि दुकानंही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. हिंगोली आणि उस्मानाबादेत या आंदोलनाला गालबोटही लागलं. हिंगोलीत मराठा शिवसैनिक सेनेनं दोन एस टी बसेस जाळल्या. तर उस्मानाबादेत बलात्काराच्या आरोपींना प्रतिकात्मक रित्या फाशी देण्यात आली. बीड बंद नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय संघटना, व्यापारी, सामाजिक संघटना यांनी पुकारलेल्या बीड जिल्हा बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. बीड, केज, धारूर, वडवणी, अंबाजोगाई या भागात सर्वसामान्य लोकांनी रस्त्यावर उतरून आरोपीना शिक्षा करण्याची मागणी केली. बंद दरम्यान तीन ते चार बसवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले. संबंधित बातम्याकोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार