मुंबई : नगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कारप्रकरणाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही विधीमंडळात सुरु आहे.  कोपर्डीतील बलात्कार अत्यंत पाशवी कृत्य आहे. याप्रकरणी तातडीने तपास करुन, तपासात कुठेही दोष राहणार नाहीत याची काळजी घ्या. जेणेकरुन न्यायालय आरोपींना मरेपर्यंत फाशीच सुनावेल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.   चांद्यापासून - बांद्यापर्यंत महिलांवर अत्याचार सुरु आहेत, हे अत्याचार कसे रोखता येतील याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं. कोपर्डीत घटना घडली त्यावेळी आरोपी दारु पित बसले होते, तिथे अनधिकृत दारुचा अड्डा चालूच कसा होता? अशी परिस्थितीच नसती, तर कोपर्डी बलात्कार झालाच नसता, असं अजित पवार म्हणाले.   गुन्हेगाराला जात-धर्म नसतो, मात्र गुन्हेगारांवर कडक कारवाई आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जनतेला विश्वास, आधार वाटेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी द्यावं, अशी मागणी अजित पवारांनी केली.   बलात्कार पीडितांना नुकसान भरपाईची देण्याची रक्कम वाढवली आहे. मात्र त्यांच्यावर ती वेळच येऊ नये अशी व्यवस्था करा. पोलीस अधिकाऱ्यांची बदली करुन प्रश्न सुटणार नाहीत, सुस्त अधिकाऱ्यांवर कारवाई आवश्यक आहे, असं अजित पवारांनी नमूद केलं.   मुख्यमंत्र्यांचा सहकाऱ्यांवर विश्वास नाही? यावेळी अजित पवारांनी मंत्र्यांच्या खासगी सचिवांवरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मंत्र्यांच्या खासगी सचिवांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांकडूनच होत आहे. मंत्र्यांबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना समजावा हा त्यामागील हेतू असावा. मात्र मुख्यमंत्र्यांना स्वत:च्याच मंत्र्यांवर विश्वास नाही का, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.   अजित पवारांच्या भाषणातील मुद्दे *कोपर्डी बलात्कार: घटना घडली त्यावेळी आरोपी दारु पित बसले होते, तिथे अनधिकृत दारुचा अड्डा चालूच कसा होता? अजित पवार *कोपर्डी बलात्कार: कालपासून चर्चेची मागणी करतोय, पण त्यामध्ये चालढकल करण्यात आली- अजित पवार *कोपर्डी बलात्कार: मुख्यमंत्र्यांनी काल वाचून दाखवलेल्या निवेदनाची प्रत अद्याप मिळाली नाही - अजित पवार *कोपर्डी बलात्कार: चांद्यापासून - बांद्यापर्यंत महिलांवर अत्याचार सुरु आहेत - अजित पवार *कोपर्डी बलात्कार: गुन्हेगाराला जात-धर्म नसतो, मात्र गुन्हेगारांवर कडक कारवाई आवश्यक - अजित पवार * *कोपर्डी बलात्कार: महाराष्ट्रातील जनतेला विश्वास, आधार वाटेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी द्यावं - अजित पवार *कोपर्डी बलात्कार: बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात हे घडतंय अत्यंत खेदजनक * कोपर्डी बलात्कार: पीडितांना नुकसना भरपाईची रक्कम वाढवली, मात्र त्यांच्यावर ती वेळच येऊ नये अशी व्यवस्था करा- * कोपर्डी बलात्कार: अधिकाऱ्यांची बदली करुन प्रश्न सुटणार नाहीत, सुस्त अधिकाऱ्यांवर कारवाई आवश्यक *कोपर्डी बलात्कार: आरोपींना न्यायालयाकडून फाशीच होईल, असा तपास व्हावा *कोपर्डी बलात्कार: आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, सरकारला विरोधी पक्ष पूर्ण सहकार्य करेल *कोपर्डी बलात्कार: कोपर्डीत असं वातावरण निर्माण का झालं? संबंधित अधिकारी दोषी असतील तर कारवाई करा - *कोपर्डी बलात्कार: मंत्र्यांच्या खासगी सचिवांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांकडूनच का? मंत्र्यांवर विश्वास नाही का? - *कोपर्डी बलात्कार : पोलिसांमध्ये आदरयुक्त भीती असावी संबंधित बातम्या

कोपर्डी बलात्कार : महाराष्ट्रासाठी काळा दिवस : सुप्रिया सुळे

कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर कोपर्डी प्रकरण: राम शिंदेंसोबत फोटोत असलेली ‘ती’ व्यक्ती आरोपी नाही आरोप करणाऱ्यांनी राम शिंदेंची जाहीर माफी मागावी: मुख्यमंत्री राम शिंदे फोटो प्रकरणावर धनंजय मुंडेंकडून दिलगिरी मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाई कोपर्डी बलात्कारातील आरोपीचा राम शिंदेंसोबत फोटो, राष्ट्रवादीचा दावा