- एलटीटी – सावंतवाडी (01037) – 24 तास उशिरा
- करमाळी – पुणे (01446) - 14 तास उशिरा
- मंगला एक्सप्रेस (12617) - 14 तास उशिरा
- मंगलोर एक्सप्रेस (12134) - अनिश्चित काळ उशिरा
- गणपती स्पेशल (01114) - तीन तास उशिरा
मुंबईच्या दिशेने परतण्यासाठी निघालेले अनेक प्रवाशी स्थानकातच अडकले आहेत. कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकांमध्ये गाडीची वाट पाहत बसलेल्या प्रवासांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे.
सावंतवाडीत प्रवाशी संतापले!
सावंतवाडीत रेल्वे प्रवाशी संतापल्याचे पाहायला मिळाले. प्रवाशी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. या घटनेमुळे रेल्वेस्थानकावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला.