सेल्फीचा नाद तरुणाच्या जीवावर बेतला
एबीपी माझा वेब टीम | 02 Sep 2017 12:18 PM (IST)
बीडमधील प्रसिद्ध कपिलधार धबधब्यावर जुनेद शेख हा 18 वर्षांचा तरुण मित्रांसोबत फिरायला गेला होता. धबधब्याखाली त्याला सेल्फीचा मोह आवरता आला नाही,
बीड : बीड जिल्ह्यात कपिलधार धबधब्यावर तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. जुनेद शेख असं या तरुणाचं नाव असून सेल्फी काढताना तोल गेल्यानं पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. बीडमधील प्रसिद्ध कपिलधार धबधब्यावर जुनेद शेख हा 18 वर्षांचा तरुण मित्रांसोबत फिरायला गेला होता. धबधब्याखाली त्याला सेल्फीचा मोह आवरता आला नाही, मात्र सेल्फी घेत असताना त्याचा पाय घसरला आणि तोल जाऊन तो पाण्यात पडला. यातच त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. जुनेदचे वडिल बीडच्या पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे.