सिंधुदुर्ग: ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वेचे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक कोलमडलं आहे. रेल्वे गाड्या तब्बल 5 तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचं मुहुर्त लांबणार आहे. गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.

रेल्वे गाड्या अर्धा तास ते पाच तासांपर्यंत लेट आहेत. डाऊन मांडवी, डबल डेकर,  दुरांतो,  हापा, निझामुद्दीन एक्सप्रेस वगळता इतर गाड्या उशिराने धावत आहेत.

ट्रेन बंचिंगमुळे वेळापत्रक कोलमडल्याचं सांगण्यात येत आहे.

उशिराने धावणाऱ्या गाड्या: 

१०१०४ अप मांडवी एक्सप्रेस १.२० तास उशिराने,

१०१११ कोकण कन्या २.३० तास उशिरा

११००३ तुतारी ५५ मिनिटे उशिरा

१२०५१ जनशताब्दी अर्धा तास उशिरा

१२४३२ राजधानी एक तास उशिरा

१६३४६ नेत्रावती अर्धा तास उशिरा

२२११५ LTT  करमली एसी सुपरफास्ट अडीच तास उशिरा

२२१२० तेजस एक तास उशिरा

२२६३० तिरुनेलवेली दादर ३.३० तास उशिरा

०१००७ सावंतवाडी गणपती विशेष २.३० तास उशिरा

सीएसटीएम सावंतवाडी विशेष १.४५ तास उशिरा

०१४३२ सावंतवाडी पुणे दीड तास उशिरा

०१४२४ झाराप पुणे विशेष ३.३० तास उशिरा

 ०९०१० मंगलोर बांद्रा विकली स्पेशल तब्बल ५ तास उशिरा

 २२६३० तिरुनवेली दादर ३.३. तास उशिरा

इत्यादी एक्स्प्रेस गाड्या तर रत्नागिरी दादर पेसेंजर २ तास आणि दिवा सावंतवाडी पेसेंजर दीड तास उशिराने धावत आहेत.