कोल्हापूरमधील राधानगरी धरण 100 टक्के भरलं, शिवाजीपुल रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद
एबीपी माझा वेब टीम | 03 Aug 2016 02:57 PM (IST)
कोल्हापूर: महाडमधील सावित्री नदीवरच्या ब्रिटीश कालिन पुलासोबत दोन बसेस वाहून गेल्याने यात अनेक प्रवासींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील राधानगरी धरण पूर्ण भरल्याने शिवाजी पुल आज रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुसळधार पावसाने राधानगरी धरण 100 टक्के भरले असून धरणातून 9600 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग पंचगंगा नदीत होत आहे. त्यामुळे नदीच्या पात्रात झापाट्याने वाढ होते आहे. त्यामुळे जिल्हातील अनेक मार्गावर पाणी येण्याच्या शक्यतेने कोल्हापूरचा शिवाजी पुल आज रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक शिये मार्गे वळवण्यात येणार आहे.