कोल्हापूर : आम्हाला सोयी-सुविधा हव्या आहेत, आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या.. कोल्हापूर जिल्ह्यातल्या निलजी गावात लागलेला पेट्रोल-डिझेलच्या दराचा फलक फारच बोलका आहे. आर्थिक विकासात कित्येक पटींनी पिछाडीवर असलेलं कर्नाटक सोयी-सुविधा पुरवण्यात मात्र महाराष्ट्रापेक्षा कितीतरी पटींनी सरस ठरत आहे.
सीमेपासून 2 ते 3 किलोमीटरवर असलेल्या निलजीच्या माथी महाराष्ट्राचा शिक्का आहे. त्यामुळे कर्नाटकातील सवलतींपासून निलजीकर वंचित आहेत. म्हणूनच कर्नाटकमध्ये सामील होण्यासाठी आता आवाज उठत आहे.
कर्नाटकात मिळणाऱ्या सोयी-सुविधा
शेतकऱ्यांची कर्जमाफी
शेतीसाठी बी-बियाणं
अनेक आरोग्य योजना
अत्यल्प दरात धान्य पुरवठा
शेतीसाठी मुबलक वीज
पेट्रोल-डिझेलचे तुलनेनं कमी दर
निलजीसह जवळपास 26 गावं वेशीवर वसली आहेत. या सर्वच गावांमध्ये आता विरोधाचे आवाज बुलंद होत आहेत. विशेष म्हणजे या गावांना महाराष्ट्रापेक्षा कन्नड संस्कृतीच जास्त आपलीशी वाटते.
एकीकडे बेळगावसह निपाणीला महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी वर्षानुवर्ष घमासान सुरु आहे, तर दुसरीकडे कर्नाटकात जाण्यासाठी आटापिटा सुरु आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांनी आडमुठेच्या सीमा भेदून भूमिपुत्रांच्या हिताला प्राधान्य द्यायला हवं, तरच विविधतेत एकता जोपासणाऱ्या भारताची ओळख आ-चंद्र सूर्य कायम राहील.
सोयी-सुविधांसाठी कर्नाटकात जाऊ द्या, कोल्हापूरच्या गावाची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Apr 2018 06:14 PM (IST)
कर्नाटकातील सवलतींपासून कोल्हापुरातील निलजीकर वंचित असल्यामुळे गावकऱ्यांनी कर्नाटकमध्ये सामील होण्यासाठी आवाज उठवला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -