मुंबई : 2017-18 च्या रब्बी हंगामासाठी राज्याच्या यवतमाळ, जळगाव आणि वाशिम या तीन जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ जारी केलेल्या तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना लागू करण्याचा विचार सरकार करत आहे.


दुष्काळ जाहीर केलेले तालुके

यवतमाळ - राळेगाव, दिग्रस, घाटंजी, केळापूर आणि यवतमाळ
वाशिम - वाशिम
जळगाव - मुक्ताईनगर आणि बोदवड

जून ते सप्टेंबर 2017 या कालावधीमध्ये कमी झालेला पाऊस तसंच भूजल पातळीत झालेली घट, पाण्याची उपलब्धतता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची उपलब्धता या सर्व गोष्टींचा विचार करुन, प्रभावित झालेल्या तालुक्यामध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन, राज्यातील आठ तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

आठ तालुक्यांना मिळणार या सवलती


- जमीन महसुलात सुट
- सरकारी कर्जाचे पुर्नगठन
- शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती
- कृषीपंपाच्या चालू वीजबिलात 33.05 टक्के सूट
- शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
- रोजगार हमी योजनेच्या कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता
- पाणी पुरवठ्यासाठी टँकर्सची सोय
- शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणं
- माध्यान्ह भोजन योजना दीर्घ मुदतीच्या सुट्टीच्या काळातही सुरु ठेवण्यात येणार