कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभरात अभद्र युती-आघाडी पाहायला मिळत आहे. कोल्हापूरही त्याला अपवाद ठरलं  नाही. कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना रोखण्यासाठी  आणि जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष बसवण्यासाठी स्वत: मोर्चेबांधणी केली. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे भाजप समर्थक सदस्यांना घेऊन एका बसमधून आले. आश्चर्य म्हणजे या व्हॉल्वो बसचे ड्रायव्हिंग स्वत: खासदार धनंजय महाडिक करत होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजप आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या सर्जेराव पाटील यांची वर्णी लागली.
शौमिका पाटील यांना 37 मते मिळाली. त्यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील गटाच्या बंडा माने यांचा पराभव केला. बंडा माने यांना 28 मते मिळाली. तर उपाध्यक्ष शिवसेनेचे सर्जेराव पाटील यांनाही 37 मतं मिळाली. त्यांनीही काँग्रेसच्या जयवंत शिंपी यांचा पराभव केला. शिंपी यांना 28 मते मिळाली. दरम्यान, महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला. आधी भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेची मदत घेण्याच्या तयारीत होते. मात्र शिवसेनेच्या 7 सदस्यांनी भाजपला साथ दिली, तर 3 जण काँग्रेसच्या बाजूने राहिले. कोण आहेत धनंजय महाडिक? धनंजय महाडिक हे कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. मात्र काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यासोबतच्या हाडवैरामुळे ते राज्यभरात प्रकाशझोतात आले आहेत.
सतेज पाटील यांनी महाडिक यांना लोकसभा निवडणुकीत मदत केल्याचा दावा पाटील यांचा होता. मात्र तरीही महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत त्याची परतफेड न करता, स्वत:च्या चुलत भावाला सतेज पाटील यांच्याविरोधात उभे केल्याचा आरोप सतेज पाटील यांचा आहे. विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक हे भाजपच्या तिकीटावर सतेज पाटील  यांच्याविरोधात लढून विजयी झाले. तेव्हापासून सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे कट्टर वैरी आहेत. एकाच घरात अनेक पक्ष  महाडिक या एकाच कुटुंबात अनेक पक्ष असल्याचं चित्र विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळालं होतं.  विधानपरिषदेतील माजी आमदार महादेवराव महाडिक हे काँग्रेसमध्ये होते. त्यांचे पुतणे खासदार धनंजय महाडिक हे पूर्वी शिवसेनेत आणि सध्या राष्ट्रवादीत आहेत.  तर महादेवराव महाडिकांचा मुलगा अमल हे भाजपच्या तिकीटावर विधानसभेत पोहोचले आहेत.  कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल कोल्हापूर–( ६७ जागा )
  • भाजप–१४
  • शिवसेना–१०
  • काँग्रेस–१४
  • राष्ट्रवादी–११
  • इतर–१८
  • प्रमुख पक्ष–भाजप/अपक्ष/मित्रपक्ष
  संबंधित बातम्या

पवारसाहेब, खा. महाडिकांच्या भूमिकेबाबत गप्प का?

सतेज पाटील महाडिकांना विजय मिळवून देणार की मंडलिक बाजी मारणार? 

सतेज पाटील आणि धनंजय महाडिक पाच वर्षानंतर भेटतात तेव्हा 

कोल्हापूरचे भाजप आमदार शरद पवारांच्या भेटीला