कोल्हापूर: शहराजवळच्या ऐतिहासिक कात्यायनी मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी संस्थानकालीन हार पळवून नेला. इतकंच नाही तर चोरट्यांनी दोन किलो सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. घटनास्थळाची कोल्हापूर पोलिसांनी पाहणी केली असून आरोपीचा शोध सुरु आहे.

कात्यायनी मंदिर हे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरापासून सुमारे 12 किमी अंतरावर आहे. आजूबाजूला शेती, झाडं अशा निसर्गसंपन्न असलेल्या परिसरात हे पुरातन मंदिर आहे. या भागात तशी वर्दळ कमी असते. मंदिर परिसरातच पुजाऱ्यांची घरं आहेत, तिथेच हे पुजारी राहतात.



मात्र आज पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरात घुसून, देवीचे दागिने लंपास केले. ही बातमी समजताच आसपासच्या गावातील लोकांनी मंदिर परिसरात गर्दी केली.