इलेक्ट्रीक शॉक देऊन मारहाण, कोल्हापूर पोलिसांची थर्ड डिग्री
एबीपी माझा वेब टीम | 13 Nov 2017 09:04 PM (IST)
कोल्हापूर पोलिसांच्या थर्ड डिग्री कारवाईला सामोरा गेलेला रामाकांत गावडे नावाचा तरूण समोर आला आहे.
सांगली : अनिकेत कोथळेच्या हत्येमुळे सांगली पोलिसांची अब्रू धुळीला मिळाली असतानाच कोल्हापूर पोलिसांनीही असाच प्रकार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. कोल्हापूर पोलिसांच्या थर्ड डिग्री कारवाईला सामोरा गेलेला रामाकांत गावडे नावाचा तरूण समोर आला आहे. पोलिसांनी त्याच्यावर केलेल्या अत्याचाराची कहाणी त्याने एबीपी माझाला सांगितली. अनिकेत कोथळेच्या हत्येविरोधात सांगलीमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान रमाकांत गावडे सामील झाला होता. यावेळी त्याने त्याच्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात वाचा फोडली. ''इलेक्ट्रीक शॉक देऊन मारहाण'' दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर कोल्हापूर पोलिसांची प्रतिक्रिया घेण्याचाही एबीपी माझाचा प्रयत्न आहे. पाहा व्हिडिओ :