Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महानगरपालिकेने (KMC) जयंती नाल्यालगत असलेल्या पंपिंग स्टेशनजवळील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाने नोटीस धाडल्यानंतर कोल्हापूर महापालिकेला जाग आली आहे. शहरातील निर्माण होणाऱ्या सांडपाण्यापैकी जवळपास 80 टक्के नाल्यातू वाहून जाते. अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल कोल्हापूर मनपा प्रशासनावर सडकून टीका केली होती. 


कसाबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नाल्यातून येणाऱ्या सुमारे 73 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. मात्र, गाळ साचल्यामुळे नाल्याची सांडपाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात नाला ओव्हरफ्लो होतो आणि सांडपाणी पंचगंगा नदीच्या पाण्यात मिसळते. इतर ऋतूंमध्ये नाला ओसंडून वाहणे क्वचितच दिसून येते कारण पंपिंग क्रिया सतत चालते.


पावसाळा संपूनही जयंती नाल्यातील सांडपाणी ओसंडून वाहत होते. महापालिकेने कारवाई करण्याऐवजी कळंबा तलावातील पाणी येत आहे, गाळ साठल्याची कारणे सांगत रडीचा डाव सुरु केला होता. त्यामुळे गाळ काढण्यासाठी प्रक्रिया राबवण्यास महिना गेला. गेल्या आठवड्यात निविदा  प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र, त्यामध्ये आणखी वेळ जाऊन सांडपाणी वाहत राहिले असेत. त्यामुळे प्रजासत्ताक सामाजिक संस्था व कॉमन मॅन संघटनेने आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळानेही तातडीने शुक्रवारी महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर महापालिकेची यंत्रणा कामाला लागली. त्यामुळे सांगितल्याशिवाय करायचे नाही, असाच प्रकार मनपा प्रशासनाचा सुरु आहे. 


दरम्यान, केएमसीचे मुख्य हायड्रॉलिक अभियंता हर्षित घाटगे म्हणाले की, गाळ काढल्याने नाल्याची एसटीपीपर्यंत वाहून नेण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल. लोकांनी नाल्यात कचरा टाकणे टाळावे. नाल्यात कचरा टाकणे देखील टाळले पाहिजे. त्यामुळे नाला अरुंद होतो. त्यामुळे आम्ही शक्य तितका गाळ काढण्याचा निर्णय घेतला आहे.


पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने 15 डिसेंबरची मुदत दिली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, एक दशकापूर्वी सुरू करण्यात आलेला एसटीपी योग्यरित्या कार्यरत आहे. सध्या शहरात दररोज निर्माण होणाऱ्या १२० दशलक्ष लिटरपैकी ९६ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची सुविधा आहे. जेथून सांडपाणी ट्रीटमेंट प्लांटमध्ये टाकले जाते तेथून छोट्या नाल्यांना मोठ्या नाल्यांशी जोडण्याची केएमसीची योजना आहे.


इतर महत्वाच्या बातम्या