कोल्हापुरात मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या वडिलांना अटक
एबीपी माझा वेब टीम | 28 May 2016 07:31 AM (IST)
NEXT PREV
कोल्हापूर : कोल्हापुरात मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बसगोंड आवटी (वडील) आणि संदीप हुक्कीरे (आरोपी) यांच्याविरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शिरोळ तालुक्यातील अकिवाट गावात ही घटना घडली. मृत भाग्यश्री बसगोंड हिने 29 मार्च रोजी स्वप्नील पल्लके याच्याशी विवाह केला. हा विवाह आंतरजातीय असल्याने कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे हे दोघेही जयसिंगपुरात भाड्याने घर घेऊन राहत होते. मात्र, लग्नानंतरही वडिलांनी वारंवार मुलीच्या घरी येऊन नवऱ्याला सोडून दे, यासाठी तगादा लावला. वडिलांच्या त्रासाला कंटाळून भाग्यश्रीने 13 मे रोजी विष प्राशन केलं. मात्र 14 मे रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी बसगोंड आवटी आणि संदीप हुक्कीरे या दोघांना अटक करण्यात आली आहे.