कोल्हापूर: भाजप आमदार राम कदम यांनी मुलीं संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यातल्या सर्वच काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याच्या सूचना आल्या होत्या. मात्र या आंदोलनाचा निरोप वेळेत न मिळाल्यामुळे, कोल्हापुरातील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये आज चांगलीच जुंपली.


भाजपच्या आमदार राम कदम यांचा निषेध नोंदवण्यासाठी, कोल्हापुरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना दोन वाजण्याची वेळ देण्यात आली  होती. दोन वाजता काँग्रेस कमिटीमध्ये काही निवडक महिला कार्यकर्त्या पोहोचल्या.

2 वाजून गेल्यानंतरही महिला शहराध्यक्ष आणि त्यांच्या गटातील महिला वेळेवर पोहोचल्या नाहीत. त्याच्या अगोदरच पोहोचलेल्या महिलांनी हे आंदोलन उरकून टाकलं.

उशिरा आलेल्या महिलांना याचा चांगलाच राग आला आणि या महिला कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेस कमिटीच्या परिसरातच चांगलीच जुंपली. एकमेकींचा उद्धार करणाऱ्या या कार्यकर्त्यांचे भांडण सोडविताना पुरुष कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ आले.

राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य

"कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले.

राम कदमांना उमेदवारी देऊ नका

वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार राम कदम यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये. तसंच माता-बहिणींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाडसाने राम कदमांवर कारवाई करावी, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.

उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्याप्रकरणी जोरदार हल्ला चढवला.

संबंधित बातम्या

धाडस दाखवा, राम कदमांवर कारवाई करा, उद्धव यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

राम कदम पहिलेच नाहीत, भाजपच्या वाचाळवीरांची यादी मोठी

"मुली पळवण्याचा प्रकार घडला, तर पहिला गुन्हा राम कदमांवर दाखल व्हावा"

प्राची देसाईच्या डायलॉगसाठी राम कदमांनी गोविंदांना उतरवलं!

पूर्वी म्हणायचे 'टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर', आव्हाडांचा राम कदमांवर हल्लाबोल 

राम कदम पहिलेच नाहीत, भाजपच्या वाचाळवीरांची यादी मोठी 

राम कदम माफी मागा नाहीतर, चपलेने हाणू : अॅड. स्वाती नखाते पाटील