मुंबई : आमदार राम कदम यांच्या मुली पळवण्याबाबतच्या बेताल वक्तव्यावरुन मराठवाड्यातील अॅड. स्वाती नखाते पाटील यांनी त्यांना चपलेने हाणायचा इशारा दिला आहे. तुम्ही एखाद्या मुलीला हात लावून दाखवा तिने तुम्हाला पळवून पळवून नाही हाणले तर याद राखा असं अॅड. पाटील यांनी म्हटले आहे. तसेच माफी मागितल्याशिवाय मराठवाड्यात पाय ठेवू नका असा इशारा अॅड. पाटील यांनी दिला आहे. अॅड. स्वाती नखाते पाटील यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओतून त्यांनी आपल्या खास शैलीत राम कदम यांचा समाचार घेतलाय.

ज्यांच्यात कोणताही दम नाही अशा भाजपाच्या राम कदम यांनी महाराष्ट्रातील तमाम महिलांचा अपमान केलाय. मुली पळवण्याची भाषा हे खुले आम करतात यांना सत्तेचा माज आला असल्याचेही त्यांनी म्हटले. महाराष्ट्रात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तुमच्यासारख्या सत्तेवर असलेल्या आमदाराने मुली आणि स्त्रियांबाबत असे वक्तव्य करणे तुम्हाला शोभते का? असा थेट सवाल अॅड. पाटील यांनी राम कदमांना विचारला आहे.

जोपर्यंत महिलांची माफी मागत नाही तोपर्यंत तुम्हाला मराठवड्यात फिरकू देणार नाही. हिंमत असेल तर मराठवाड्यात येऊन दाखवा तुम्हाला इथे पळवून हाणले नाही तर मी माझे नाव बदलेन असा इशारा अॅड. स्वाती नखाते पाटील यांनी दिला आहे.



दहीहंडीच्या कार्यक्रात राम कदम नेमकं काय म्हणाले होते?

"कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले.



संबंधित बातम्या

..तर मुलीला पळवून आणण्यास मदत करेन: आमदार राम कदम

पूर्वी म्हणायचे 'टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर', आव्हाडांचा राम कदमांवर हल्लाबोल

“मुली पळवण्याचा प्रकार घडला, तर पहिला गुन्हा राम कदमांवर दाखल व्हावा”

प्राची देसाईच्या डायलॉगसाठी राम कदमांनी गोविंदांना उतरवलं!

आमदार राम कदम रावणाच्या रुपात, मनसेचे पोस्टर