सिमेंट पाईपमध्ये बाईक घुसून सख्ख्या भावांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 17 Sep 2017 06:23 PM (IST)
कोल्हापूर महापालिकेने ड्रेनेज दुरुस्तीसाठी रस्ता खोदला होता. रस्त्यावर ठेवलेल्या सिमेंटच्या पाईपमध्ये बाईक घुसली
कोल्हापूर : रस्त्यावर ठेवलेल्या सिमेंटच्या पाईपमध्ये बाईक घुसून कोल्हापुरात भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोघा सख्ख्या भावांना प्राण गमवावे लागले आहेत. कोल्हापूर महापालिकेने ड्रेनेज दुरुस्तीसाठी रस्ता खोदला होता. रस्त्यावर ठेवलेल्या सिमेंटच्या पाईपमध्ये बाईक घुसली. या अपघातात दोघंही तरुण जागीच मृत्युमुखी पडले. कोल्हापुरातील दसरा चौक आणि महावीर महाविद्यालया दरम्यान अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमा झाली होती.