Booster Dose : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) बूस्टर डोस (Booster Dose) संबंधी महत्त्वाची घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यास देखील सुरुवात होत आहे. देशभरात सध्या लसीकरण वेगानं सुरु आहे. सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. मा त्या पार्श्वभूमीवर अनेक देशात बूस्टर डोस देण्यात येत आहे. आता भारतातही बूस्टर डोस देण्यात येणार आहे. आज, 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसंच 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. 


बूस्टर डोससंबंधी महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं


बूस्टर डोस कुणाला?


10 जानेवारीपासून भारतात कोरोनाचे ( corona) दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि विविध आजार असलेल्या 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लशीचा बुस्टर डोस ( Booster shot ) देण्यात येणार आहे. 


बूस्टर डोससाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे?


कोविड-19 लसीच्या बूस्टर डोससाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाचे सध्याचे प्राधान्य संपूर्ण पात्र लोकांना दोन डोससह संपूर्ण लसीकरणाला आहे. असे केंद्राने सांगितले होते.  


बूस्टर डोस घेताना कोणती लस घ्यायची?


बुस्टर डोस देताना या आधी जी लस घेतली आहे, त्याच लशीचा बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.  ज्या लोकांनी कोव्हॅक्सीनची लस घेतली आहे, अशांना कोव्हॅक्सीनचाच बुस्टर डोस देण्यात येईल तर ज्यांनी कोव्हिशील्ड लस घेतली आहे, अशांना कोव्हिशील्डचाच बुस्टर डोस देण्यात येईल. 


CoWin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता आहे का?


देशभरात आजपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. या बूस्टर डोससाठी CoWin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असेही केंद्राने म्हटले आहे. 


लस कुठं घ्यायची?


पात्र लोक ज्यामध्ये आरोग्यसेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्याधी असलेल्यांचा समावेश आहेत, ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, ते कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात. हा बूस्टर डोस घेण्यासाठी कोविनवर स्लॉट बुक करणे गरेजेचे नाही. मात्र हे डोस कुठे मिळू शकतील याची माहिती कोविन अॅपवरच मिळू शकणार आहे. तिसऱा डोस घेतल्यानंतर, त्याची माहिती लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरही दिसणार आहे.


वृद्ध व्यक्तींना ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांनी डोस कसा घ्यायचा?


ज्या 60 वर्षावरील व्यक्ती अनेक व्याधींनी ग्रस्त आहेत, त्यांनाच हा डोस देण्यात येणार आहे. या 22 व्याधींची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. हा डोस घेण्यासाठी डॉक्टरांकडून इतर कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने हा बूस्टर डोस घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.


लसीकरण मोफत आहे की पैसे द्यावे लागणार?


आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि विविध आजार असलेल्या 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना ही लस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत देण्यात येणार आहे. मात्र खासगी हॉस्पिटल्स आणि खासगी लसीकरण केंद्रांवर यासाठी पैसे मोजावे लागतील.


दोन डोसनंतर किती दिवसांनी बूस्टर डोस घ्यावा?


ज्यांचे दोन डोस घेऊन नऊ महिने म्हणजेच 39 आठवडे झाले आहेत, त्यांनाच हा तिसरा बूस्टर डोस घेता येणार आहे. संबंधित व्यक्तीचा हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, त्यांना कोविनकडून तिसरा डोस घेण्याबाबतचा मेसेजही येणार आहे.





LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 





 



महत्त्वाच्या इतर बातम्या :