Ambabai Mandir Kolhapur : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आजपासून किरणोत्सवाला प्रारंभ होणार आहे. हा सोहळा पुढील पाच दिवस असेल. दरम्यान, देवीच्या किरणोत्सव सोहळ्यात अडथळे येऊ नयेत, यासाठी ते दूर करण्यात आले आहेत. मंदिरात पारंपरिक उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे आकर्षक रोषणाईसह पणत्यांनी मंदिर परिसर उजळून गेला. वैशिष्ट्यपूर्ण वास्तूशैलीचा नमुना अशी या किरणोत्सवाची ओळख आहे. (Kirontsava festival in Ambabai temple)


दीपोत्सवानिमित्त पंचगंगा नदी घाट येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी खजानीस वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते पंचगंगा नदीची आरती करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे वाटप झाले. 


राजाराम बंधाऱ्यावर दीपोत्सव 


त्रिपुरारी पौर्णिमेचं औचित्य साधून राजाराम बंधाऱ्यावरही  दीपोत्सव पार पडला. त्यामुळे पणत्यांनी घाट उजळून गेला होता.  जुना तसेच अपूर्ण असलेल्या नवीन पुलावर लेसर किरण अन् रोषणाई  करण्यात आली होती. यावेळी बावड्यासह शहरवासियांनी गर्दी केली होती.  


अंबाबाई मंदिरात आढळला 12व्या शतकातील यादवकालीन संस्कृत शिलालेख


दरम्यान,अंबाबाई मंदिराचे नैसर्गिक संवर्धन करण्यासाठी संगमरवर काढण्याचे काम सुरु आहे. यावेळी सापडलेल्या एका शिलालेखाने मंदिराचा समृद्ध वारसा किती प्रचंड आहे याबाबत पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हे काम सुरु असतानाच 12 व्या शतकातील शिलालेख सापडला आहे. मुख्य मंदिरातील सरस्वती मंदिराच्या पूर्वेकडील भिंतीवरील संगमरवर काढण्यात आल्यावर 2 बाय 1 फूट दगडी शिलालेख सापडला आहे. दगडी भिंतीवर कोरलेल्या 12व्या शतकातील संस्कृतमधील शिलालेखाने मंदिराच्या समृद्ध वारशावर अधिक प्रकाश टाकला गेला आहे, ज्याची मूळ रचना आठव्या शतकाच्या आसपास बांधली गेली होती.


भिंतीवर आडव्या पद्धतीने शिलालेख आहे. त्यावर १६ ओळींमध्ये गड्डेगली ( म्हणी) कोरल्या आहेत. मराठीमध्ये गड्डेगली किंवा कन्नडमधील गड्डेगालू ही स्थानिक संस्कृती आणि अनुभवांवर आधारित म्हणी आहेत. ताजा शिलालेख हा 12 व्या शतकातील यादवकालीन शिलालेख आहे. यावरूनच मंदिराचा वारसा किती समृद्ध आहे याची माहिती मिळते. यापूर्वी मंदिराच्या आवारात नवग्रह मंदिराच्या खांबांवर दगडी शिलालेख सापडले होते.


इतर महत्वाच्या बातम्या