Kirit Somaiya vs Thackeray Government LIVE : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून किरीट सोमय्यांना थांबवलं : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
Kirit Somaiya vs Thackeray Government : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची मालिका सुरु करणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौऱ्यावर पोलिसांना बंदी घातली आहे.
किरीट सोमय्यांवरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून किरीट सोमय्यांना थांबवलं, असं स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिलं.
हसन मुश्रीफांनी आरोप केलाय की, मला चंद्रकांत पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफ दिली होती. मी गेलो नाही म्हणून मला टार्गेट केलं जातंय. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, "कोणी ऑफर दिली मुश्रीफांना? आम्ही असं ऑफर घेऊन फिरत थोडी असतो. असे आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत, कोणालाही द्यायला."
किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. गृहमंत्र्यांनी केलेली कारवाई मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल, अशी खोचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोमय्या यांच्यावरील ही कारवाई मुख्यमंत्री कार्यालयाची नाही तर गृह मंत्रालयाची आहे, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. तसेच सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेनं या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. तसेच शिवसेनेच्या सुत्रांचं असंही म्हणणं होतं की, मुख्यमंत्र्यांना या संपूर्ण कारवाईची काहीही कल्पना नव्हती. याच सर्व घडामोडींबाबत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी, नसेल माहिती मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांनी केलेल्या कारवाईची, असा उपरोधिक टोला लगावला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, "मी परवाच्या पत्रकार परिषदेत म्हटलंय की, हसन मुश्रीफांना माझं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. ते कसेही असले तरी माझे मित्र आहेत. त्यांच्या झोपेला एक गोळी न घेता माझं नाव पुरणार असेल तर त्यांच्या गोळीचे पैसे वाचवणं ही मित्र या नात्यानं माझी जबाबदारी आहे. माझं नाव घेण्यासाठी आणि माझ्या विरोधा अब्रूनुकसानाचा दावा करण्यासाठी त्यांना पूर्ण परवानगी आहे."
कायद्याची लढाई कायद्यानंच लढा, असं म्हणत येत्या दोन दिवसांत काँग्रेसच्याही काही नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले जातील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जे आरोप केले त्यावर मुश्रीफांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर मुश्रीफांनी चंद्रकांत पाटलांवर जे आरोप केले पाटलांनीही या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच यावेळी बोलताना हसन मुश्रीफांना माझं नाव घेतल्याशिवाय झोपही लागत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
"मला भाजपमधील नेते सांगतात, आम्ही सोमय्यांना म्हणत होतो मुश्रीफांच्या नादाला लागू नका. गरीब आणि सामान्य जीवाभावाचे लोक माझ्यासोबत आहेत. काल आरोप केला त्याबद्दल त्यांनी माफी मागायलाच हवी. आज त्यांनी अप्पासाहेब नलावडे कारखान्याच्या घोटाळ्याबाबत बोलले. मात्र ब्रिक्स इंडिया कंपनी आणि माझा, माझ्या जावायाचा काही संबंध नाही. मी सगळे डॉक्युमेंट काढले, ब्रिक्स इंडिया कंपनी ही 44 लाख कॅपिटलची कंपनी आहे, ही शेल कंपनी नाही, त्याचं शेअर कॅपिटल 1 लाख आहे, मग 100 कोटीचा घोटाळा होईल कसा? 2012-13 मध्ये हा कारखाना शासनाने ब्रिक्स फॅसिलिटीला चालवायला दिला होता 10 वर्षांसाठी सहयोगी तत्वावर. ते म्हणतात 2020ला दिला. सोमय्यांनी अभ्यास करायला हवा होता, 2020 मध्ये त्यांनी ही कंपनी सोडली. दोन वर्ष आधीच 43 कोटीला दहा वर्षापूर्वी घेतला, तोटा होत असल्यामुळे दोन वर्षापूर्वीच कंपनीने कारखाना सोडला. 2020 ला कारखाना घेतला नाही, 2012-13 मध्ये राज्य सरकारकडून सहयोगी तत्वावर घेतला, पण नुकसानीमुळे दोन वर्ष आधीच कारखाना सोडला.", असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.
मुश्रीफ म्हणाले की, "किरीट सोमय्या सातत्यानं सांगतात की, मी ही कागदं काढतो आणि फडणवीसांकडे घेऊन जातो. पुढे ते सांगतात तसंच मी करतो. चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थानं लढावं, असं कुणाचातरी वापर करुन बदनामी करुन, माझ्या कुटुंबियांची बदनामी करुन त्यांना काहीही मिळणार नाही. माझ्यावर करण्यात येत असलेले सगळे आरोप खोटे आहेत. बिनबुडाचे आहेत. मागेही मी या आरोपांचा निषेध केला होता आणि 100 कोटी रुपयांचा फौजदारी अब्रूनुकसानीचा दावा करायचं मी ठरवलेलं आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आजही सोमय्यांनी केलेला आरोप बिनबुडाचा आणि खोटा आहे. त्यांच्या या खोट्या आरोपांमुळे त्यांची सीएची पदवी खरी आहे का? असा प्रश्न पडतोय. मला त्यांना सांगायचंय की, मी तुमच्याकडे एकदा सीए पाठवतो आणि जे दोन माझ्यावर आरोप केलेत. त्याबद्दल सविस्तर माहिती घेतल्यावर त्यांच्या लक्षात येईल की, हसन मुश्रीफ हा कसा माणूस आहे."
"चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्यासाठी चिंतेचा विषय म्हणजे, ते ज्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी भाजप भुईसपाट झालेला आहे. हा कुणी भुईसपाट केलाय, तर हसन मुश्रीफ यासाठी मुख्य कारणीभूत आहेत. म्हणून त्यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली होती. त्यावेळी मी त्यांना पवार एके, पवार असं ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी आयकर विभागाची धाड टाकली. विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी हे कारस्थान त्यांनी केलं.", असा आरोप मुश्रीफांनी केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या जे काही आरोप करतायत, त्यामागे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं षडयंत्र आहे. विशेषतः चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टर माईंड आहेत. तसेच किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचंही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले की, "गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या जे काही आरोप करतायत, त्यामागे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं षडयंत्र आहे. विशेषतः चंद्रकांत पाटील हे याचे खरे मास्टर माईंड आहेत. मी अनेकदा तुमच्यासमोर आणि जनतेसमोर माझे नेते (शरद पवार), महाविकासआघाडी सरकार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत, परमबीर सिंह प्रकरणी, तसेच केंद्रीय तपासयंत्रणांच्या गैरवापराबाबत सातत्यानं पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. तसेच याबाबत मी सातत्यानं आवाज उठवला आहे. त्यामुळंच भारतीय जनता पार्टीचे नेतेमंडळी सातत्यानं मला कसं थांबवता येईल, दाबता येईल याचा प्रयत्न करत होते. आणि किरीट सोमय्यांचा टूल म्हणून वापर केलाय."
हसन मुश्रीफांमुळे मला अंबाबाईचं दर्शन करता आलं नाही. ठाकरे सरकार हे घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक करणारं सरकार आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. पोलिसांनी मला कोणत्या आदेशाअंतर्गत मला गणेश विसर्जनापासून रोखलं. मला काल सहा तास कोंडून ठेवण्यात आलं. मी हात जोडून विनंती केली की ऑर्डर दाखवा. पुराव्यासह मी कागल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार होतो पण मला अडवलं गेलं, असंही ते म्हणाले. सीएसएमटी स्टेशनवर मला पोलिसांनी धक्काबुक्की देखील केली. मुंबईबाहेर जाण्यापासून रोखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मला पोलिसांनी दाखवले, असंही सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्विकारावी, असं ते म्हणाले. सत्तेसाठी तुम्ही हिरवा रंग धारण केला असेल. उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा आम्ही चालून देणार नाही, असंही ते म्हणाले. पोलिसांच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार असल्याचंही ते म्हणाले. माझ्यावर हल्ला व्हावा ही सरकारची इच्छा आहे का? असा सवालही ते म्हणाले.
हसन मुश्रीफ किरीट सोमय्या यांना जशास तसे उत्तर देणार असून किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर अकरा वाजता हसन मुश्रीफ मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. गेल्या वेळी सोमय्या यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर तातडीनं मुश्रीफ यांनी उत्तर दिलं होतं. त्यावेळी मुश्रीफ यांनी बिचाऱ्या सोमय्या यांना काही माहिती नाही, चंद्रकांत पाटील आणि समरजित घाटगे यांनी माहिती दिल्याचं म्हटलं होतं.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची मालिका सुरु करणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौऱ्यावर पोलिसांना बंदी घातली आहे. यामुळे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ यांचा घोटाळा उघड केल्यानंतर आता आपण विदर्भातील नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार होतो. शरद पवार यांना हे कळल्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगून माझा कोल्हापूर दौरा प्रतिबंधित केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची मालिका सुरु करणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौऱ्यावर पोलिसांना बंदी घातली आहे. यामुळे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ यांचा घोटाळा उघड केल्यानंतर आता आपण विदर्भातील नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार होतो. शरद पवार यांना हे कळल्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगून माझा कोल्हापूर दौरा प्रतिबंधित केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले की, "ठाकरे सरकार एवढं घाबरलंय मला की, आता मला कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी लावली आहे. माझं भांडण प्रशासन किंवा पोलिसांसोबत नाही. त्यांनी मला सांगितलं आहे की, कराड पोलीस स्टेशनला उतरावं. मी तशापद्धतीनं उतरणार आहे. मी कोल्हापुरात अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे. आज त्यांनी मला थांबवलं, मी दोन दिवसांनी पुन्हा येणार." पुढे बोलताना ते म्हणाले की, "मी घोटाळे समोर आणतोय, हसन मुश्रीफ यांचा पहिला घोटाळा, दुसरा घोटाळा, तिसरा घोटाळा त्यासाठी कोणत्याही गनिमी काव्यानं येण्याची काहीही गरज नाही."
काल रात्रीपासून हा हायव्होल्टेज ड्रामा सुरु आहे. किरीट सोमय्या कोल्हापूरला जाणार असं दोन दिवसांपूर्वीच त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना नोटीस पाठवली आणि त्यामध्ये नमूद केलं की, हसन मुश्रीफ आणि त्यांचे कार्यकर्ते इथं मोर्चा काढणार आहेत आणि राष्ट्रवादी या मोर्चाचं स्वागत करणार आहे. त्यामुळं या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरचा दौरा टाळावा, अशा पद्धतीचा मजकूर होता. तसेच यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये, कोल्हापूर जिल्हा बंदी असा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी काल दुपारपासूनच किरीट सोमय्यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात केला. तसेच त्यांना ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांपासून इतर भाजप नेते तिथं दाखल झाले आणि त्या सर्वांनी किरीट सोमय्या यांना मुंबईतून बाहेर जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर किरीट सोमय्याही आक्रमक झाले होते.
किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश काढले होते. सर्व पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जनात व्यस्त राहणार असल्यानं दौऱ्यासाठी बंदोबस्त पुरवायला प्रशासनानं असमर्थता दर्शवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारा विरोध पाहता दौरा रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्या यांना विनंती होती.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याला कोल्हापूर जिल्ह्याधिकाऱ्यांना मज्जाव केला होता. तरिही ते कोल्हापूरला रवाना झाले. किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त त्याठिकाणी होता. पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. मात्र सोमय्यांनी पोलिसांना अडवू नका अशी विनंती केली आणि महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना कराड रेल्वे स्थानकात रोखलं. रात्रभर हायव्होलटेज ड्रामा पाहायला मिळाला.
किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे. पोलिसांनी विनंती केल्यानंतर किरीट सोमय्या कराडमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेसमधून उतरले आहेत. पोलिसांच्याच गाडीतून कराडमधील शासकीय विश्राम गृहात ते पोहोचले आहेत. अशातच कराडमधूनच किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार असून आपली भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता ही पत्रकार परिषद पार पडेल. या पत्रकार परिषदेनंतर ते कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पार्श्वभूमी
कराड : किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे. पोलिसांनी विनंती केल्यानंतर किरीट सोमय्या कराडमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेसमधून उतरले आहेत. पोलिसांच्याच गाडीतून कराडमधील शासकीय विश्राम गृहात ते पोहोचले आहेत. अशातच कराडमधूनच किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेणार असून आपली भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता ही पत्रकार परिषद पार पडेल. या पत्रकार परिषदेनंतर ते कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याला कोल्हापूर जिल्ह्याधिकाऱ्यांना मज्जाव केला होता. तरिही ते कोल्हापूरला रवाना झाले. किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त त्याठिकाणी होता. पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. मात्र सोमय्यांनी पोलिसांना अडवू नका अशी विनंती केली आणि महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना कराड रेल्वे स्थानकात रोखलं. रात्रभर हायव्होलटेज ड्रामा पाहायला मिळाला.
कराडमध्ये पोलिसांनी अडवल्यानंतर किरीट सोमय्या म्हणाले...
किरीट सोमय्या म्हणाले की, "ठाकरे सरकार एवढं घाबरलंय मला की, आता मला कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी लावली आहे. माझं भांडण प्रशासन किंवा पोलिसांसोबत नाही. त्यांनी मला सांगितलं आहे की, कराड पोलीस स्टेशनला उतरावं. मी तशापद्धतीनं उतरणार आहे. मी कोल्हापुरात अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे. आज त्यांनी मला थांबवलं, मी दोन दिवसांनी पुन्हा येणार." पुढे बोलताना ते म्हणाले की, "मी घोटाळे समोर आणतोय, हसन मुश्रीफ यांचा पहिला घोटाळा, दुसरा घोटाळा, तिसरा घोटाळा त्यासाठी कोणत्याही गनिमी काव्यानं येण्याची काहीही गरज नाही."
किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी मज्जाव
किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश काढले होते. सर्व पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जनात व्यस्त राहणार असल्यानं दौऱ्यासाठी बंदोबस्त पुरवायला प्रशासनानं असमर्थता दर्शवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारा विरोध पाहता दौरा रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्या यांना विनंती होती.
सोमय्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरुन हायव्होल्टेज ड्रामा
दरम्यान, काल रात्रीपासून हा हायव्होल्टेज ड्रामा सुरु आहे. किरीट सोमय्या कोल्हापूरला जाणार असं दोन दिवसांपूर्वीच त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना नोटीस पाठवली आणि त्यामध्ये नमूद केलं की, हसन मुश्रीफ आणि त्यांचे कार्यकर्ते इथं मोर्चा काढणार आहेत आणि राष्ट्रवादी या मोर्चाचं स्वागत करणार आहे. त्यामुळं या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरचा दौरा टाळावा, अशा पद्धतीचा मजकूर होता. तसेच यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये, कोल्हापूर जिल्हा बंदी असा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी काल दुपारपासूनच किरीट सोमय्यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात केला. तसेच त्यांना ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांपासून इतर भाजप नेते तिथं दाखल झाले आणि त्या सर्वांनी किरीट सोमय्या यांना मुंबईतून बाहेर जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर किरीट सोमय्याही आक्रमक झाले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -