मुंबई : प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेतला घोटाळा अर्थात PAP घोटाळ्यात किरीट सोमय्यांनी आज थेट शरद पवार (Shaad Pawar)  आणि कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. हा घोटाळा 20  हजार कोटींचा आहे. शाहीद बलवा आणि पवारांचे निकटवर्ती चोरडिया यांना लाभ मिळाला असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी ( Kirit Somaiya)   केलाय. 1 हजार 903  सदनिका बांधल्या जात आहेत. त्यासाठी वेगवेगळी आरक्षणं हटवली जात आहेत असा आरोप त्यांनी केला.  


सोमय्या म्हणाले,  PAP घोटाळ्याचा प्रसाद शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाला देखील भेटला आहे. PAP घोटाळ्यात पवार परिवार सामील आहे. मुंबई महापालिका ठाकरे सरकारच्या 2000 कोटींच्या PAP घोटाळ्यात आता शरद पवार  आणि पवार परिवाराचे नावही पुढे आले आहे. भांडूप येथील 1903 सदनिकेचा कॉन्ट्रॅक्ट चोरडीया बिल्डरचा पुणे येथील न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. ला देण्यात आला.  न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. कंपनीने यासाठी शरद पवारांचे बंधू प्रताप पवार यांच्या Neo Star Infra Projects Pvt. Ltd. कंपनीसोबत करार केला आहे. ही  जागा प्रताप पवार यांच्या Neo Star Infra Projects Pvt. Ltd. कंपनीची आहे. त्याच्या सोबत या सदनिका बांधण्यासाठीचे डेव्हलपमेंट राईट, करार चोरडिया समूहाच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. कंपनीने केले आहे. 


एका सदनिकेच्या मागे 40 लाख नफा शरद पवार यांचे बंधू प्रताप पवारांना


1903 सदनिका महापालिका बाजारभावाने  58 लाखात एक सदनिका घेणार आहे. ही सदनिका बांधण्यासाठी जमीन व बांधकामाचा खर्च म्हणून 15 ते17 लाख खर्च होणार आहे. म्हणजेच एका सदनिकेच्या मागे रुपये 40 लाख नफा शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार यांची कंपनी व चोरडिया बिल्डर्सच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी कंपनीला मिळणार आहे, असे सोमय्या म्हणाले. 


सिरम इन्स्टिट्यूटने  435 कोटी रुपयाचे शेअर 6% व्याज दराने गुंतवले


प्रताप पवार यांची निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. चे शेअर कॅपिटल फक्त रुपये 1 लाख आहे. परंतु या कंपनीत 2021 मध्ये 19 मार्च 2021 रोजी सिरम इन्स्टिट्यूटने  435 कोटी रुपयाचे शेअर 6% व्याज या दराने वीस वर्षासाठी या कंपनीत प्रेफरेन्स शेअर कॅपिटल म्हणून गुंतवले आहेत. या कंपनीने कोविड लस तयार केली होती.   1 लाखाचे शेअर कॅपिटल प्रताप पवार व त्यांच्या पत्नीचे  435 कोटीचे गुंतवणूक 6% दराने सिरम इन्स्टिट्यूट यांनी केली आहे.


PAP घोटाळ्याची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी करावी


100 कोटीच्या गुंतवणूकीच्या समोर रुपये 1000 कोटीचा भांडूप PAP घोटाळ्याचा फायदा चोरडिया यांच्या  न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी कंपनीला  झाला आहे. Neo Star Infra projects कंपनीही सहभागी झाली आहे. या PAP घोटाळ्याची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. 


हे ही वाचा :