Kirit Somaiya on Hasan Mushrif ED Raids: माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासोबतच ग्रामविकास खात्याचे सचिव राजेश कुमार मिना यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. एकूण 158 कोटींचा घोटाळा हसन मुश्रीफ यांनी केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी बोलताना केला आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुश्रीफांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही किरीट सोमय्यांनी केला आहे. 


विविध साखर कारखान्यांमध्ये घोटाळे झाले आहेत आणि ते सर्व घोटाळे इंटरलिंक आहेत, असं किरीट सोमय्यांचं म्हणणं आहे. केवळ हसन मुश्रीफच नाही अनिल परबही आहे आणि त्यानंतर अस्लम शेख यांचा नंबर लागेल, अशीही स्पष्टोक्ती किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. 


भाजप नेते किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, "ठाकरे यांच्या माफिया सरकारमधील आणखी एक मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आता ईडीची कारवाई सुरू झाली. 158 कोटी रुपये हसन मुश्रीफ यांनी स्वतःच्या कुटुंबीयांच्या, मुलाच्या आणि जावयाच्या कंपनीच्या नावानं घोटाळ्याचे पैसे कोलकात्याच्या अनेक बोगस कंपन्यांमधून स्वतःच्या कुटुंबीयांच्या कंपनीत घेतले. त्यानंतर ते पैसे सर सेनापती घोरपडे साखर कारखान्यात ट्रान्सफर केले."


पाहा व्हिडीओ : Kirit Somaiya on Hasan Mushrif Full PC : 158 कोटींचा घोटाळा, मुश्रीफांचा काऊंटडाऊन सुरू



आज महालक्ष्मीनं आशीर्वाद दिला, हसन मुश्रीफचं काउंटडाऊन सुरू झालं : सोमय्या 


"कोल्हापुरातील आई महालक्ष्मी मला आज पावली. मला आठवतंय 28 सप्टेंबर रोजी मी कोल्हापुरात जायला निघालो होतो आणि त्यावेळी हसन मुश्रीफ, तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरेंनी मला कोल्हापुरला जाऊ दिलं नाही. पण आज महालक्ष्मीनं आशीर्वाद दिला. हसन मुश्रीफचं काउंटडाऊन सुरू झालं आहे. मी दोन उदाहरणं देतो रजत कंज्युमर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून हसन मुश्रीफ कुटुंबीयांच्या खात्यात 13 कोटी 85 लाख रुपये आले. हे पैसे आले 2013-14 मध्ये. पण ती कंपनी 2004 मध्येच बंद झाली होती. जी कंपनी अस्तित्वातच नाही, तिथून ते मुश्रीफ कुटुंबीयांच्या खात्यात येतात. तिथून ते साखर कारखान्याच्या खात्यात जातात. माऊंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड 24 कोटी 75 लाख रुपये, ही कंपनीही कधीच बंद झालेली, याच कंपनीच्या नावानं बँक अकाउंट उघडण्यात आलं. हसन मुश्रीफ रोख पैसे देतात. त्याच पैशाचा चेक बनवून कुटुंबीयांच्या खात्यात जमा होता." , असा आरोप सोमय्यांनी बोलताना केला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Hasan Mushrif ED Raid : हसन मुश्रीफांवर किरीट सोमय्यांचे आरोप; 'ते' प्रकरण नेमके आहे तरी काय?