Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा रस्ता क्रॉस करताना अपघात झाल्याची घटना घडली आहे. त्यांना अमरावतीच्या (Amravati) एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डोक्याला आणि उजव्या पायाला दुखावपत झाल्याची माहिती मिळाली आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. सकाळी 6 ते साडे सहाच्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने धडक दिली आहे. यामध्ये बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्यानं डोक्याला मार लागला आहे.




रस्ता ओलांडताना दुचाकीने बच्चू कडू यांना धडक दिल्यानं अपघात झाला. या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यावर अमरावतीतल्या खासगी रुग्णालयात उचरास सुरु आहेत. दुचाकीनं धडक दिल्यानंतर बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. 


 



माझी प्रकृती ठीक, अपघातानंतर बच्चू कडू यांचे ट्वीट


कटोरा रोडवरील आराधना चौक जवळ आज सकाळी 6.15 वाजता बच्चू कडू रोड ओलांडताना एका दुचाकीने त्यांना धडक दिली ज्यात त्यांना इजा झाली. उजव्या पायावर आणि डोक्यावर मार लागल्याने डोक्यावर चार टाचे पडले आहे. सध्या रुग्णालयात कोणालाच एन्ट्री दिली जात नाही. दुचाकीवरून धडक देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, अपघातानंतर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी ट्वीट केलं आहे. रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला आहे. माझी प्रकृती ठीक असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया कोणाही भेटायला येऊ नये. अशी सर्व हितचिंतकांना बच्चू कडू यांनी विनंती केली आहे.  


Accident : राजकीय नेत्यांच्या अपघाताचे सत्र सुरु


गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या अपघाताचे (Accident) सत्र सुरु आहे. गेल्या काही दिवसापूर्वी भाजपचे आमदार जयकुमार गोरे (MLA Jayakumar Gore) यांचाही पघात झाला होता. या अपघातात त्यांना देखील गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना पुण्याला (Pune) नेण्यात आलं होतं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (NCP Dhananjay Munde) यांच्या गाडीला देखील अपघात झाला होता. त्यांनाही दुखापत झाली आहे. सध्या मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तसेच माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांच्या गाडीचाही अपघात झाला होता. 


आमदार बच्चू कडू यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवले जाणार



Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू यांना पुढील उपचारासाठी थोड्याच वेळात नागपूरला हलविले जाणार आहे. सिटी स्कॅन आणि पुढील उपचारसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बच्चू कडू यांना नागपुरात हलवण्यात येणार आहे. आज सकाळी 6.15 वाजता अमरावती शहरातील आराधना चौकाजवळ एका दुचाकीने बच्चू कडू यांना धडक दिली होती. या अपघातात कडू जखमी झाले होते.