Kirit Somaiya: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुन्हा एकदा अॅक्शनमोडमध्ये पाहायला मिळत आहे. किरीट सोमय्या यांनी मंगळवारी (23 ऑगस्ट) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लिहून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi) मंत्री राहिलेल्या अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यावर एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केलाय. मुंबईच्या (Mumbai) मढ मार्वे येथील सीआरझेड जमिनीवरील अनधिकृत स्टुडिओच्या बांधकामाला अस्लम शेख यांनी परवानगी दिली होती. ज्यात 1000 कोटींचा भ्रष्टाचार झालाय, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचे काही नेते पाहणी करण्यात आलीय.
दरम्यान, माजी मंत्री अस्लंम शेख यांच्या अनधिकृत बंगल्यांची पाहणी करण्यासाठी भाजपनेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या सोबत भाजपचे खासदार गोपाला शेट्टी, आमदार अतूल भातखळकर पोहचले आहेत. या स्टुडीओ बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
किरीट सोमय्या काय म्हणाले
"अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी स्टुडिओचा दौरा केला होता. 28 कमर्शिअल बांधकाम, 10 लाख स्क्वेअर फुटचं बांधकाम आहे. यासाठी पर्यावरण मंत्रालयानं याकरीता परवानगी अधिकृत परवानगी दिली होती. पर्यावरण मंत्र्यांना विचारतो, आरे संदर्भात एवढं धत्तिंग केलं, इथे तुम्हाला पर्यावरण दिसलं नाही का? या प्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारनं यासंदर्भात चौकशी सुरु केलीय. कोव्हिड काळात बांधकाम केलं हे आदित्य ठाकरेंना दिसलं नाही का? तिकडे परबचा रिसोर्ट तुटणार आणि इकडे अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाचे स्टुडिओ तुटणार."
किरीट सोमय्यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिली. मी केंद्र सरकारकडे जात तक्रार केल्यानंतर त्यांनी विचारलं कोणत्या नियमांतर्गत परवानगी दिली. 22 फेब्रुवारी 2021 रोजी पर्यावरण मंत्रालयानं परवानगी दिली ती बेकायदेशीर होती. दुसरीकडे परवानगी 6 महिन्यासाठी होती आणि 19 महिने झाले आहेत. स्टुडिओ समुद्रात बांधले आहेत, त्यामुळं हे तर तुटणारच", असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.
किरीट सोमय्या यांचं ट्वीट
किरीट सोमय्या यांनी 23 ऑगस्ट 2022 ला एक ट्विट केलं होतं. ज्यात त्यांनी असं म्हटलं होतं की," मुंबईच्या मढ मार्वे येथील सीआरझेड जमिनीवरील एक हजार कोटींचा अनधिकृत स्टुडिओचा बांधकामाला महविकास आघाडी नी 22/2/2021 रोजी मान्यता दिली होती. महाविकास सरकारचे पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालक मंत्री यांना त्यावेळेला तक्रारी आल्या होत्या, त्यांनी ह्या भागाची पाहणी ही केली होती."
हे देखील वाचा-