दौंड : गेल्या अनेक वर्षांपासून अनेक ग्रामपंचायत या बिनविरोध होत होत्या. ग्रामपंचायतीमध्ये देखील यंदा निवडणूक लढवली जात आहे. मात्र त्याला अपवाद ठरली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खुटबाव ही ग्रामपंचायत. 1975 सालापासून आजपर्यंत ही ग्रामपंचायत बिनविरोध होते आहे.
खुटबाव हे दौंड तालुक्यातील गाव आहे. हे गाव 6000 लोकवस्तीचे आहे. मात्र या गावात गेली 45 वर्ष ग्रामपंचायत निवडणुकच झालेली नाही. या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 13 इतकी आहे. यावेळी 36 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गावातील सगळी मंडळी निवडणुकीआधी एकत्र येतात आणि मग ठरवतात की कोणाला निवडून द्यायचे..
माजी आमदार रमेश थोरात यांचं खुटबाव हे गाव आहे . रमेश थोरात हे 1975 साली पहिल्यांदा बिनविरोध सरपंच झाले. त्यानंतर सलग ते पुढे 15 वर्ष सरपंच राहिले. तेव्हापासून ते आजपर्यंत ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहे. यंदा मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे 2 उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेता आला नाही. त्यामुळे मात्र त्यातील एका उमेदवाराने दुसऱ्याला पाठींबा दिला आणि परंपरा कायम राखली.
गावात फक्त ग्रामपंचायत नाहीतर पतसंस्था, ग्रामविकास सोसायटी, डेअरी, सहकारी संस्था या देखील या गावात बिनविरोध होतात. त्यामुळे गावात कोणत्याही मुद्यावर राजकारण वा गटातटाचे राजकारण होताना दिसत नाही. शासनाचा जो येणारा निधी आहे तो योग्य प्रकारे वापरून या गावात भुयारी गटारे, रेल्वे स्टेशन, संपूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेरे, महाविद्यालय, गावातील लोकांना पिण्यासाठी फिल्टरचे पाणी तसेच गावात प्रशस्त बाजारपेठ देखील उभी करण्यात आली आहेत. गट तट नसल्याने गावाचा विकास करण्यास मदत होते.
हिवरेबाजार, राळेगणसिद्धी यांसारख्या अशा अनेक गावात गेल्या अनेक वर्षांपासून बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक होत होत्या. मात्र यावेळी या आदर्श गावात निवडणूक होत आहेत. त्यामुळे खुटगाव गावाने आपली परंपरा कायम ठेवली आहे.. त्यामुळे या ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
संबंधित बातम्या :